मुंबई Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत वादग्रस्त चित्रपट 'इमर्जन्सी'मुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. 'इमर्जन्सीची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली असून कंगना यामुळे प्रचंड संतापली आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार होता. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे या चित्रपटाला अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. दरम्यान कंगना राणौतच्या म्हणण्यानुसार, तिला आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड) यांना धमक्या येत होत्या. शिरोमणी अकाली दल आणि शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं 'इमर्जन्सी'वर आक्षेप व्यक्त केला आहे.
'इमर्जन्सी'वर बंदीची मागणी : चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्यानंतर आता कंगना राणौतनं तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना राणौतनं एका पॉडकास्टमध्ये म्हटलं, "माझ्या चित्रपटावरच आणीबाणी लादण्यात आली आहे, हे खूपच निराशाजनक आहे, मी माझ्या देशावर खूप नाराज आहे." कंगना राणौतनं पुढे म्हटलं, "माझ्या चित्रपटात काही नवीन नाही, याआधी 'इंदू सरकार' आणि 'सॅम बहादूर'मध्येही या गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत, मग या चित्रपटांना प्रमाणपत्र का दिलं गेलं. यानंतर कंगनानं पुढं सांगितलं की, तिच्या चित्रपटावर बंदी घालताना समितीनं चित्रपट आणि तिच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकांची दखल घेतली होती. ती निडर असल्याचं तिनं म्हटलं." कंगनानं पुढं म्हटलं, "आपण अनेक बेताल गोष्टी ऐकत असतो, आज आपण कुणाला घाबरू, उद्या कुणीतरी, लोक आपल्याला घाबरवत राहतील, कारण आपण इतक्या सहज घाबरतो, आपण किती घाबरणार?"