महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जगभरात बॉक्स ऑफिसवर राज्य करणार 'हे' साऊथमधील पाच चित्रपट - Upcoming South Movies Collection - UPCOMING SOUTH MOVIES COLLECTION

Upcoming South Movies Collection : 2024 वर्षात साऊथमधील काही अशी चित्रपट आहेत, जे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसतील. आम्ही तुम्हाला या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

Upcoming South Movies Collection
साऊथमधील आगामी चित्रपट कलेक्शन (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 4:58 PM IST

मुंबई - Upcoming South Movies Collection : 2024 हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोठे वर्ष ठरू शकते. यावर्षी जगभरात साऊथ सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडताना दिसेल. अनेक साऊथ सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या महिन्यात साऊथ सिनेसृष्टीचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट रिलीज होणार आहे. यानंतर कमल हसन स्टारर 'इंडियन 2', अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2 द रुल', ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1', राम चरणचा 'गेम चेंजर' आणि रजनीकांतचा 'वेट्टयान' असे काही चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज होईल.

'कल्की 2898 एडी' :प्रभासनं स्टारर 'सालार'नं बॉक्स ऑफिसवर 700 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'सालार' हा चित्रपट गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झाला होता. आता प्रभासचे चाहते त्याच्या बहुप्रतीक्षित 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा चित्रपट 27 जून रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर 500 कोटीचा व्यवसाय करेल अशी आशा अनेकजण करत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि कमल हासन आहेत.

इंडियन 2 : साऊथचा सुपरस्टार कमल हासलच्या तमिळ चित्रपट 'विक्रम'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता कमल हासन त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'इंडियन 2'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांचं दिग्दर्शन शंकर यांनी केलंय. 'इंडियन 2' जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा ओलांडू शकतो.

पुष्पा 2 द रूल :अल्लू अर्जुन स्टारर 'वैकुंठपुरमुलू' आणि 'पुष्पा द राइज' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर राज्य केलंय. दरम्यान अल्लूचा 'पुष्पा 2 द रूल' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिक कमाई करू शकतो. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल दिसणार आहेत.

देवरा पार्ट 1 :'आरआरआर' सारखे जगभर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा ज्युनियर एनटीआर अडीच वर्षांनंतर 'देवरा पार्ट 1' या चित्रपटात दिसणार आहे. 'आरआरआर'नं जगभरात बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. 'देवरा पार्ट 1' इतका कलेक्शन करू शकणार नसला तरी चित्रपट 500 कोटींचा आकडा गाठू शकेल अशी अपेक्षा केली जात आहे. हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.

वेट्टय्यान : 'जेलर'मधून बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिक कमाई करून रजनीकांतनं चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं होत. आता 'वेट्टय्यान' या चित्रपटामुळे रजनीकांत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा चित्रपट 10 ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. दरम्यान हे पाच चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर 2500 ते 3000 कोटी रुपयांची कमाई करणार आहेत.

हेही वाचा :

  1. सुशांत सिंहनं आत्महत्या केलेल्या घरात शिफ्ट झाली अदा शर्मा - Adah Sharma
  2. उर्फी जावेदच्या ओठ, डोळे आणि चेहऱ्यावर सूज, जाणून घ्या कारण - Uorfi Javed
  3. 'कल्की 2898 एडी'च्या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू, अ‍ॅडव्हान्स बुकिंगचीही तारीख ठरली - Kalki 2898 AD

ABOUT THE AUTHOR

...view details