महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर 9 दिवसात छप्परफाड कमाई - Kalki 2898 AD Box Office Collection - KALKI 2898 AD BOX OFFICE COLLECTION

Kalki 2898 AD Box Office Collection : 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड वेगानं कमाई करत आहे. या चित्रपटानं 9 दिवसात 800 कोटीहून अधिक कमाई केली आहे.

Kalki 2898 AD Box Office Collection
कल्की 2898 एडी बॉक्स ऑफिस कलेक्शन ((IMAGE- MOVIE POSTER (vyjayanthimovies)))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 7:14 PM IST

मुंबई - Kalki 2898 AD Box Office Collection : साउथ सुपरस्टार प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' देशांतर्गत आणि जगभरात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कलेक्शन करत आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपट 27 जून रोजी जगभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट आता रिलीजच्या 10 व्या दिवसात आहे. 'कल्की 2898 एडी'नं नऊ दिवसांत जगभरात 800 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप वेगानं कमाई करत आहे. 'कल्की 2898 एडी'मधील प्रभास दीपिका, पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी हे मुख्य भूमिकेत असून आता अनेकजण यांच्या अभिनयाचे सोशल मीडियाद्वारे कौतुक करताना दिसत आहेत.

'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिस एकूण कमाई :'कल्की 2898 एडी' चित्रपट अनेकांना आवडत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान 'कल्की 2898 एडी'च्या निर्माते वैजयंती मेकर्सनं आज 6 जुलै रोजी चित्रपटाची नऊ दिवसांची जगभरातील कमाई सादर केली आहे. रिलीजच्या नऊ दिवसांत या चित्रपटानं 800 कोटींहून अधिकचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. 'कल्की 2898 एडी'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटी टप्पा पार केला आहे. दुसऱ्या वीकेंडच्या अखेरीस हा चित्रपट जगभरात 1000 कोटी रुपयांचा तर भारतात 500 कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय करेल, असं सध्या बोललं जात आहे.

'कल्की 2898 एडी'ची धमाकेदार कमाई : 'कल्की 2898 एडी'नं 9व्या दिवशी भारतात 17.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तसेच हिंदी पट्ट्यात 9.35 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन 432.1 कोटी रुपयांचं झाल्याचं दिसत आहे. 'कल्की 2898 एडी'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 191.5 कोटी रुपये आणि देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 95 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता. यावेळी हिंदी पट्ट्यात पहिल्या दिवशी 21 कोटींची कमाई झाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी जगभरात 107 कोटी रुपये आणि 54 कोटी रुपये देशांतर्गत कमाई केली होती, तसेच हिंदी पट्ट्यात 18 कोटी रुपये कमावले होते.

हेही वाचा :

  1. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोणचा लूक पाहून चाहते झाले घायाळ - SANGEET CEREMONY
  2. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'नं जगभरात 500 कोटींचा टप्पा केला पार - kalki 2898 ad box office collection
  3. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा 'संगीत सोहळा' संपन्न - sangeet ceremony

ABOUT THE AUTHOR

...view details