महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

काजल अग्रवाल सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'सिकंदर'मध्ये घेणार एन्ट्री - Kajal Aggarwal in Sikandar - KAJAL AGGARWAL IN SIKANDAR

Kajal Aggarwal in Sikandar : साऊथ अभिनेत्री काजल अग्रवाल सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत 'सिकंदर' चित्रपटात एन्ट्री घेणार असल्याचं समजत आहे. सध्या या चित्रपटावर खूप वेगानं काम सुरू आहे.

सिकंदरमध्ये काजल अग्रवाल
Kajal Aggarwal in Sikandar (सलमान खान-काजल अग्रवाल (Etv Bharat))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 6:45 PM IST

मुंबई - Kajal Aggarwal in Sikandar : अभिनेता सलमान खाननं 2024 च्या सुरुवातीला 'सिकंदर' या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. 'सिकंदर' चित्रपटाच्या संबंधित प्रत्येक अपडेटची प्रतीक्षा चाहते करत असतात. आता अलीकडेच चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटामध्ये आणखी एक साऊथ अभिनेत्री एन्ट्री करत आहे. अभिनेत्री काजल अग्रवाल देखील 'सिकंदर'च्या कलाकारांमध्ये सामील होणार आहे. साजिद नाडियाडवाला प्रॉडक्शनच्या या चित्रपटात सलमान आणि रश्मिका मंदान्ना आधीच फायनल झाले आहेत.

काजल 'सिकंदर'च्या स्टार कास्टमध्ये : काजल अग्रवालबरोबर 'सिकंदर'मध्ये सत्यराज आणि प्रतीक बब्बर हे कलाकार देखील असतील. काजलनं यापूर्वी 'सिंघम' आणि 'स्पेशल 26' सारख्या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जुलैमध्ये, 'सिकंदर'च्या निर्मात्यांनी कलाकारांमध्ये सत्यराज आणि प्रतीक बब्बर यांचं स्वागत केलं होतं. नाडियाडवाला यांनी ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर लिहिलं होतं," चित्रपटात तुमचं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. टीम 'सिकंदर'मध्ये तुझा समावेश करणे अभिमानास्पद आहे."

जखमी असूनही 'भाईजान' करत आहे शूट : दरम्यान, सलमान खानच्या बरगडीला दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर देखील तो 'सिकंदर'साठी शूटिंग करत आहे. अलीकडेच एका इव्हेंटमध्ये सलमान खानच्या तब्येतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. यानंतर त्याला सोफ्यावरून मोठ्या कष्टानं उठावं लागलं होतं. 'भाईजान'च्या बरगड्यांना दुखापत झाली आहे, यामुळे सध्या तो अत्यंत सावधगिरीनं शूटिंग करत आहे. साजिद नाडियादवाला प्रस्तुत आणि एआर मुरुगादॉस दिग्दर्शित, 'सिकंदर' 2025च्या ईदला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटातील काजल अग्रवालच्या भूमिकेबाबत माहिती सध्या समोर आलेली नाही. लवकरच निर्माते याबद्दल अधिकृत घोषणा करू शकतात. दरम्यान काजलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी ती 'इंडियन 2' या चित्रपटामध्ये कमल हासन आणि सिद्धार्थबरोबर दिसली होती. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला होता. आता पुढं ती 'मेरुपू' आणि 'थाथास्थु' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'लाइट्स, कॅमेरा आणि हा आला सिकंदर', चित्रपटाच्या सेटवर दिसली सलमान खानची झलक - Salman Khan Sikandar
  2. 'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण, सेटवरील सलमान खानसह रश्मिका मंदान्नाचे फोटो व्हायरल - SALMAN KHAN RASHMIKA MANDANNA
  3. Kajal Aggarwal son : 'सिंघम' अभिनेत्री काजलने साजरा केला मुलाचा पहिला वाढदिवस; इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details