मुंबई - Devara Trailer: साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या आगामी 'देवरा' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक झाला आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी नवीन पोस्टर जारी करून चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 10 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 'देवरा'मधून जान्हवी कपूरनं साऊथ चित्रपसृष्टीत पदार्पण केलं आहे. ती पहिल्यांदाच ज्युनियर एनटीआरबरेबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तो काळ्या कपड्यामध्ये दिसत आहे. याशिवाय त्याच्या हातात एक शस्त्र आहे.
'देवरा' चित्रपटाचा ट्रेलर कधी होणार रिलीज ? : पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "आज साजरा करा, काही दिवसात विजय मिळवा, 10 सप्टेंबरपासून देवरा ट्रेलरसह भीतीचा सामना करा." पोस्ट शेअर होताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया शेअर दिल्या आहेत. एकानं यूजरनं यावर लिहिलं, "ऑल द बेस्ट, एनटीआर. " दुसऱ्या एकानं लिहिलं "मास ऑन द वे." आणखी एकानं लिहिलं, "मी हा चित्रपट पाहाण्यासाठी खूप आतुर आहे." कोरटाला शिवा दिग्दर्शित 'देवरा' चित्रपटात सैफ अली खान हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल.