मुंबई - ज्यूनियर एनटीआरचा सर्वात प्रतीक्षित 'देवरा' चित्रपट 27 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी ज्यू. एनटीआरचे चाहते खूपच उतावीळ झाले होते. दरम्यान, तेलंगणाच्या खम्मम येथील वेंकटेश्वर थिएटरमध्ये स्क्रीनिंगला उशीर झाल्यामुळे चाहत्यांनी तोडफोड केली. खरंतर, चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यापूर्वी थिएटरला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मोठ्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित असताना 'देवरा'चा शो सुरू न झाल्यानं प्रेक्षकांचा संयम तुटला आणि जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी थिएटरमध्ये तोडफोटड सुरू केली.
थिएटर तोडफोड सुरू असताना बरेच लोक जखमीही झाले आहेत. थिएटरमध्ये राडा सुरू झाल्यानंतर तातडीनं पोलीस थिएटरमध्ये पोहोचले. परंतु जमाव मोठा असल्यामुळं नियंत्रण मिळवणं कठीण झालं. पोलीसांच्या येण्यानं मात्र जमाव शांत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
तांत्रीण अडचणी निर्माण झाल्यानं हा गोंधळ झाला. याबद्दल थिएटर प्रशासनानं प्रेक्षकांची क्षमा मागितली आहे. भविष्यात सर्व स्क्रीनिंग सहजतेने सुरू राहील असा विश्वासही प्रशासनानं व्यक्त केला आहे. यापुढे अशा प्रकारे पुन्हा समस्या निर्माण होऊ नये यासाठी तेलंगणा पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे.
'देवरा: भाग १' हा चित्रपट कोरटाला शिवा यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात ज्यूनियर एनटीआर लीड भूमिका साकारत आहे. या चित्रपटात सैफ अली खानने खलनायकाची भूमिका साकारली आहे तर जान्हवी कपूर हिचीदेखील यात महत्त्वाची भूमिका आहे. 'देवरा'मध्ये सैफ अली खानसह, प्रकाश राज, श्रीकांत, श्रुती मराठे आणि शाईन टिम चाको सारखे नामवंत कलाकार आहेत. पहिल्या दिवशी, 'देवरा'ला प्रेक्षकांकडून खूप प्रेम होत आहे.
हेही वाचा -
- 'देवरा: पार्ट 1'च्या रिलीजच्या जल्लोषात ज्युनियर एनटीआरच्या कट-आउटला लागली आग, देवदूतानं दाखवला समजदारपणा - Devara Part 1
- 'देवरा पार्ट 1'चं रिलीज सेलिब्रेशन झालं भव्य, प्रेक्षकांनी दिली चित्रपटाला पसंती - jr ntr movie
- विजय देवराकोंडानं रिलीजपूर्वी 'देवरा: पार्ट 1'साठी दिला 'हा' संदेश, पोस्ट व्हायरल - VIJAY DEVERAKONDA