जोधपूर - Jigra Movie: धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी आलिया भट्ट स्टारर चित्रपट 'जिगरा'च्या प्रदर्शनावर कमर्शियल कोर्ट जोधपुर महानगरनं बंदी घातली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. वकील ओमप्रकाश मेहता यांनी याप्रकरणी सांगितलं की, प्रॉडक्शन हाऊसला 5 ऑक्टोबर रोजी ईमेलद्वारे नोटीस पाठवण्यात आली होती, यानंतर याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. या नोटीसमध्ये स्पष्ट केलं गेलं आहे की, चित्रपटाचं टाइटल क्लास 41नुसार रजिस्टर्ड आहे. या अंतर्गत चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करता येत नाही.
प्रॉडक्शन हाऊसचं पत्र :यानंतरप्रॉडक्शन हाऊसनेही आपला अर्ज सादर केला होता. याप्रकरणी मेहता यांनी पुढं सांगितलं, 'आमच्या नोटीसलाही फिल्म कंपनीकडून प्रतिसाद दिला गेला नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत तात्पुरते, मनाई आदेश जारी करून चित्रपटावर बंदी घातली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तक्रारदार भल्लाराम चौधरी यांनी वकील ओमप्रकाश यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार केली आहे. भल्लाराम चौधरी हे 'जिगरा क्लासेस' नावानं, ऑनलाइन क्लासेस चालवतात. 'जिगरा' हे नाव 15 सप्टेंबर 2023 पासून ट्रेडमार्क कायदा 1999 अंतर्गत रजिस्टर्ड आहे.