मुंबई - अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित 'जिगरा' चित्रपट आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल झाल्यानंतर चर्चेत आला आहे. भट्ट आणि करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शनने सहनिर्मित केलेल्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये आलिया एका बहिणीच्या अनोख्या भूमिकेत झळकली आहे. अभिनेता वेदांग रैनानं तिच्या भावाची व्यक्तिरेखा साकारली असून यामध्ये ती भावाला परदेशातील तुरुंगातून सोडवत
शोभिता धुलिपाला यांचीही भूमिका असलेला हा चित्रपट भरपूर ड्रामा आणि थरार असलेला मनोरंजक चित्रपट आहे. 'जिगरा' रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी पहिला शो पाहणाऱ्या अनेक चाहत्यांनी चित्रपटाबद्दलची आपली मतं एक्सवर नोंदवली आहेत. अनेक समीक्षकांनी आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नमुना असल्याचं एकानं म्हटलंय. यामध्ये असलेली भावनाप्रधानता आणि आकर्षक कथानक खिळवून ठेवणारं असल्याचंही यात म्हटलंय. चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं आणि सिनेमॅटोग्राफीचंही अनेकांनी कौतुक केलंय.
"हा एक मास्टरपीस आहे. 'जिगरा' हा मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक", असल्याचं सांगत एका युजरनं पाचपैकी साडेचार स्टार दिले आहेत. दुसऱ्या एकानं हा चित्रपट भावनिक असून जोरदार हिट असल्याचं म्हटलंय. "या चित्रपटातील आलिया भट्टची व्यक्तिरेखा अगदी पहिल्या दृष्यापासून खिळवून ठेवते", असं म्हणत एका युजरनं आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलंय.