महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूरच्या गळ्यात शिखर पहारियाच्या नावाचा नेकलेस, डेटिंगच्या बातमीवर शिक्कामोर्तब!! - Janhvi Kapoor Dating - JANHVI KAPOOR DATING

Janhvi Kapoor Dating : मुंबईत पार पडलेल्या 'मैदान' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जान्हवी कपूर हजर होती. यावेळी तिनं शिखर पहारियाच्या नावाची 'शिकु' ही अक्षरे असलेला नेकलेस परिधान केला होता. त्यामुळे त्यांच्या नाते संबंधाला कुटुंबीयांनीही संमती दिली असल्याचे संकेत मिळत आहेत.

Janhvi Kapoor Dating
http://10.10.50.80:6060//finalout3/odisha-nle/thumbnail/10-April-2024/21188773_847_21188773_1712723571155.png

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 12:10 PM IST

मुंबई- Janhvi Kapoor Dating : अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहारियाला डेट करत असल्याच्या चर्चा नेहमी रंगत असतात. असं असलं तरी त्यांनी अद्याप या बातमीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तिरुपती मंदिरात दर्शनासाठी जाताना अनेकवेळा जान्हवी आणि शिखर एकत्र दिसलेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या जामनगरमधील लग्नापूर्वीच्या समारंभातही ही जोडी हजर होती. जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी निर्मिती केलेल्या 'मैदान' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जान्हवी हजर राहिल्यानंतर शिखर बरोबरच्या तिच्या नातेसंबंधला कुटुंबाचीही संमती असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी तिनं भाऊ अर्जुन कपूर आणि वडील बोनी कपूर यांच्यासह फोटोंना पोजही दिली. यावेळी तिनं परिधान केलेल्या नेकलेसमध्ये 'शिकु' अशी अक्षरे दिसल्यानं तिनं शिखर पहारियाला होकार दिल्याची चर्चा रंगली आहे.

काल रात्री, जान्हवी कपूर मैदानाच्या स्क्रिनिंगमध्ये शांत आणि आत्मविश्वासानं ऑफ-व्हाइट फ्लेर्ड पँट, मॅचिंग टॉपसह उपस्थित होती. शिखर पहारियाचा संदर्भ असलेल्या 'शिकू' नावाच्या नेकलेसमुळं तिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. कॉफी विथ करणच्या एका चर्चेत जान्हवीनं नकळतपणे शिखर पहारियाचं नाव घेतलं होतं. करणने जान्हवीला विचारलं की तुझ्या स्पीड डायलमध्ये असलेले तीन नावं कोणती. त्यावेळी तिनं पापा, खुशू आणि शिकु ही नाव घेतली. तिनं शिकु हे नाव उच्चरतात आपण बोलताना फसलोय किंवा जाळ्यात अडकलोय याची जाणीव तिला झाली होती. अशा प्रकारे जान्हवीनं शिखर आपला सर्वात चांगला मित्र असल्याचं कबुल केलं होतं.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बोनी कपूरनं जान्हवीचा कथित प्रियकर शिखर पहारिया याचंही कौतुक केलं होतं. तो आपल्या कुटुंबाला गरज असते तेव्हा सहकार्य करत असल्याची कबुलही बोनी यांनी दिली होती. जान्हवीच्या वाढदिवशी, शिखरने इंस्टाग्रामवर त्यांच्या एकत्र फोटोंसह मनापासून शुभेच्छा पोस्ट केल्या होत्या. यासाठी त्यानं दोघांचा आयफेल टॉवर समोरील रोमँटिक फोटो पोस्ट केला होता.

'मैदान' या चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटाची प्रतीक्षा अजय देवगणचे चाहते करत आहेत. यामध्ये अजय देवगणने भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची व्यक्तीरेखा साकारली आहे. 11 एप्रिल रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात प्रियमणी, गजराज राव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. जान्हवी कपूरनं शिखर पहारिया, ऑरीसह अनवाणी पायानं चढल्या तिरपती बालाजीच्या पायऱ्या - Janhvi Kapoor Climbs remple Stairs
  2. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' चित्रपटात जान्हवी कपूर करणार आयटम नंबर ?
  3. जान्हवी कपूरला कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details