मुंबई - Janhvi Kapoor :अभिनेत्री जान्हवी कपूरला या आठवड्याच्या सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाली होती. यामुळे तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता जवळपास दोन दिवसांनंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता तिच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडील बोनी कपूर जान्हवीच्या प्रकृतीबद्दल सांगितलं आहे. बोनी कपूर यांना जान्हवीच्या तब्येतीबद्दल विचारण्यात आले. त्याबद्दल माहिती देताना त्यांनी म्हटलं "तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ती बरी आहे. जान्हवी कपूरला तिच्या प्रियजनांकडून खूप प्रेम मिळाले."
जान्हवी कपूरला मिळाला डिस्चार्ज :जान्हवी कपूरलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाच्या कुटुंबातील सदस्यांनी तिची खूप काळजी घेतली. आता जान्हवीला डिस्चार्ज मिळाल्यामुळे तिचे चाहते खूप खुश आहेत. जान्हवी कपूर लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशू सारिया दिग्दर्शित 'उलझ' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात गुलशन देवय्या आणि रोशन मॅथ्यू यांच्याही भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. या चित्रपटाचा ट्रेलर हा अनेकांना आवडला होता. ट्रेलरमध्ये जान्हवी सुहाना भाटियाच्या भूमिकेत दिसली होती.