महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 6' फेम सना खानच्या घरात दुसऱ्या बाळाचे आगमन, पोस्ट व्हायरल - SANA KHAN

सना खान आणि तिचा पती मुफ्ती अनस सईद यांनी 5 जानेवारी रोजी दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहेत.

sana khan
सना खान (सना खान-मुफ्ती अनस सईद (ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 7, 2025, 10:08 AM IST

मुंबई : 'बिग बॉस 6' फेम सना खान आणि तिचा पती मुफ्ती अनस सईद यांनी चाहत्यांना एक सुंदर बातमी दिली आहे. या जोडप्यानं आपल्या घरी एका सुंदर बाळाचे स्वागत केलं आहे. 6 जानेवारी रोजी, सना खाननं ही आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामवर सुंदर पोस्ट शेअर केली. दुसऱ्या बाळाच्या आगमनानं तिच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय अनेक चाहते सना आणि मुफ्ती अनसचे सोशल मीडियाच्या माध्यामातून अभिनंदन करत आहेत. सनानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अल्लाह तालानं सर्व काही नशिबात लिहिलं आहे. जेव्हा वेळ येते, तेव्हा अल्लाह देतो आणि जेव्हा देतो तेव्हा आनंदानं पिशवी भरतो. आनंदी पालक'.

सना खाननं दिली चाहत्यांना गोड बातमी :सना खाननं 5 जानेवारी रोजी एका सुंदर मुलाला जन्म दिला. तिनं शेअर केलेली पोस्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान सना खाननं 21 नोव्हेंबर 2020 रोजी सुरतमध्ये मुफ्ती अनस सय्यदशी लग्न केलं. यानंतर जुलै 2023 मध्ये, या जोडप्यानं त्यांचा पहिला मुलगा तारिक जमीलचे स्वागत केले होते. तसेच सना 'बिग बॉस 6' (2012) मध्ये दुसरी रनर अप होती. यानंतर ती 'हल्ला बोल', 'जय हो' आणि 'वजह तुम हो ' या चित्रपटांमध्ये दिसली. याशिवाय सनानं 'झलक दिखला जा 7' आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 6' सारख्या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.

सना खानचे सोशल मीडियावर 'इतके' फॉलोअर्स : सनानं ऑक्टोबर 2020 मध्ये, मनोरंजन उद्योग सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर आपले अनेक व्हिडिओ चाहत्यांनाबरोबर शेअर करत असते. याशिवाय ती आपल्या कुटुंबाबरोबरची फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती सध्या आपल्या कुटुंबाला आपला संपूर्ण वेळ देत आहे. सोशल मीडियावर सनाचे 6.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा :

  1. Sana Khan welcome baby boy : बिग बॉस 6 फेम सना खान आणि पती मुफ्ती अनसच्या घरी पाळणा हलला, पाहा अॅनिमेटेड व्हिडिओ
  2. Sana Khans Husband Trolls: गर्भवती सना खानला पतीने कारमध्ये खेचले, ट्रोल झाल्यानंतर सनाने केला पतीचा बचाव
  3. सना खानने सोडली फिल्म इंडस्ट्री, मानवतेची सेवा करण्याचे घेतले व्रत

ABOUT THE AUTHOR

...view details