महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'सिंघम अगेन'मधील हनुमान चालीसावरुन प्रेरित 'जय बजरंग बली' गाणं रिलीज

Jai Bajrang Bali song : अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित 'सिंघम अगेन' चित्रपटामधील 'जय बजरंग बली' हे पहिले गाणे रिलीज झाले आहे.

Jai Bajrang Bali song
'जय बजरंग बली' गाणं रिलीज (( photo - Jai Bajrang Bali song poster ))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 19, 2024, 7:56 PM IST

मुंबई- निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटातील 'जय बजरंगबली' हे पहिले गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं हनुमान चालिसापासून प्रेरित आहे. 1 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटाच्या रिलीजपूर्वी 'जय बजरंग बली' गाणे रिलीज करून निर्मात्यांनी 'सिंघम अगेन'बद्दल उत्सुकता वाढवली आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सची परंपरा चालू ठेवत हे गाणं चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठी सेट करण्यात आलं आहे.

'जय बजरंग बली' गाणं हनुमान चालिसाने प्रेरित आहे

जय बजरंग बली हे गाणे हनुमान चालिसाने प्रेरित आहे. या गाण्याच्या ट्रॅकमध्ये रणवीर सिंग हनुमानाच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे जो अजय देवगणला भेटतो आणि करीनाला सीतेच्या रूपात परत आणण्यासाठी त्याला मदत करतो. गाणं रिलीज होताच, चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्याचं खूप कौतुक केलं आहे. गाणं आणि अ‍ॅक्शन सीक्वेन्स पाहून अनेकांनी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचं भाकित केलं आहे.

ट्रेलर पाहून चाहते खूश झाले

नुकताच 'सिंघम अगेन'चा ट्रेलर रिलीज झाला जो चाहत्यांना खूप आवडला होता. निर्मात्यांनी ७ ऑक्टोबरला सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज केला. कलियुगातील रामायण आणि मराठा साम्राज्याचा जबरदस्त मेळ ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये अजय देवगण रामचे प्रतिनिधित्व करत आहे, करीना कपूर आधुनिक सीतेचं आणि टायगर श्रॉफ लक्ष्मणचं प्रतिनिधित्व करत आहे. तर रणवीर सिंग बजरंगबलीचे प्रतिनिधित्व करत आहे आणि अक्षय कुमार जटायूचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याचबरोबर अर्जुन कपूर रावणाची भूमिका साकारत आहे. दीपिका पदुकोण 'लेडी सिंघम'च्या अवतारात दिसली आहे. ट्रेलर देशभक्ती आणि मनोरंजनानं परिपूर्ण आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या 24 तासांत 138 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्रेलर आहे, त्याचा रनटाइम 4 मिनिटे 58 सेकंदांचा आहे.

'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिंघम अगेनची बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया' चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details