मुंबई - JNU Trailer release :भारतातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठामध्ये जवाहरलाल नेहरू, विद्यापीठ हे सर्वोच्च मानलं जातं. याठिकाणी विद्यार्थांच्या होणाऱ्या निवडणुकांपासून ते इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा नेहमी ऐकायला मिळत असते. याचं विद्यापीठातून अनेक नामांकित व्यक्ती घडलेले आहेत. आजही जेव्हा जेएनयूमधून बाहेर पडलेला आणि कोणत्याही संस्थेत कार्यरत असलेल्या व्यक्तीबद्दल आदर बाळगला जातो. याचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला 'जहांगीर नेशनल यूनिवर्सिटी' असं नाव देऊन एक चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज 17 जून रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे.
ट्रेलरवर लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या : आता या चित्रपटाचं ट्रेलर सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. 'जेएनयू' (जहांगीर नेशनल यूनिवर्सिटी)च्या ट्रेलरमध्ये विद्यापीठात सुरू असलेले राजकारण दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात दोन विचारसरणीचे लोक विविध मुद्द्यांवर एकमेकांशी भिडताना दिसतील. 'जेएनयू' चित्रपटात उर्वशी रौतेला, रवी किशन, पियुष मिश्रा, रश्मी देसाई यांसारख्या कलाकार असणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन विनय वर्मा यांनी केलं आहे. दरम्यान, 'जेएनयू'च्या ट्रेलर पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत या चित्रपटाला मुर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. या पोस्टवर एका यूजरनं लिहिलं, "अजून एक मुर्खपणा चित्रपट फ्लॉप होईल, लिहून घ्या." दुसऱ्या एकानं लिहिलं, "आणखी एक पागलपणा करत आहे."