मुंबई - Ranbir Kapoor and Karan Johar Viral Video : अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल' चित्रपटानं जगभरात जबरदस्त कमाई केली. रणबीरचा 'ॲनिमल'चित्रपट त्याच्या 15 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'ॲनिमल'मधील रणबीरचा लूक, अभिनय आणि त्याचा संवाद आजही त्याच्या चाहत्यांच्या स्मरणात आहेत. अलीकडेच रणबीरनं गुजरातमध्ये झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यानं 'ॲनिमल' चित्रपटामधील गाण्यांवर डान्स केला होता. फिल्मफेअर अवार्डचा कार्यक्रम चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी होस्ट केला होता.
रणबीर कपूर करण जोहरवर संतापला :आता या अवॉर्ड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर करण जोहरवर ओरडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहर म्हणतो ''फक्त रणबीरच करू शकतो, रणबीरनेच करायला पाहिजे. आपली मदत रणबीरचं करू शकतो.'' यानंतर रागानं शेवटी रणबीर करणवर ओरडून म्हणतो, ''मैं बहरा नहें हूँ, सुनाई दे रहा है मुझे ( मला ऐकू येतंय, मी बहिरा नाही...)" खरंतर हा रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटातील संवाद आहे. या अवार्ड शोमधील घडलेला सीन स्क्रिप्टेड होता आणि हे सगळं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी करण्यात आलं होतं. या अवार्ड शोमध्ये रणबीर कपूरला 'ॲनिमल' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटामधील रणबीरचा अभिनय अनेकांना आवडला आहे.