मुंबई - Ira khan spotted in Bandra : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती वांद्रा येथे मित्राच्या घराबाहेर दिसत आहे. आयरा खान चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते.
आयरा खानचा व्हिडिओ व्हायरल : शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आयरा ही शॉर्ट स्कर्ट आणि ग्रे टी-शर्टमध्ये दिसत आहे. तिनं कोल्हापुरी चप्पल घातलेली आहे. आयराचा हा लूक अनेकांना खूप आवडला आहे, तर काहीजण तिला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसत आहेत. तिच्या व्हिडिओवर एका व्यक्तीनं कमेंट करत लिहिलं की, ''जर बॉडी इतकी मोटी होत असेल तर जिम ट्रेनरशी लग्न करून काय फायदा.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''आयरा ही इतकी विचित्र का राहते.'' आणखी एकानं लिहिलं, ''ही मुलगी कमी आणि मुलगा जास्त वाटते.'' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. काहीजण या व्हिडिओवर आयराबद्दल चांगली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.