मुंबई - IIFA 2024 : अभिनेता शाहरुख खान आणि विकी कौशलनं इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) अवॉर्ड्स 2024मध्ये होस्टिंग केलं. 'किंग खान'ला 'जवान' चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या मोठ्या सन्मानाबद्दल त्यानं सर्वांचे आभार मानलं. आपल्या भाषणादरम्यान, त्यानं आर्यन खानच्या अटकेशी संबंधित असलेल्या 'जवान'च्या शूटिंगदरम्यानच्या कठीण काळबद्दल उल्लेख केला. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला क्लीन चिट देण्यात आली होती.
शाहरुख खाननं केली कठिण काळाची आठवण : शाहरुख खानला इंडियन फिल्म अकादमी सोहळ्यात अवॉर्ड मिळल्यानंतर त्यानं म्हटलं, "मला इतर सर्व नामांकित रणवीर सिंग, रणबीर कपूर, विक्रांत मॅसी यांचे आभार मानायचे आहेत. हे सर्व चित्रपटात उत्तम होते. विकी कौशल आणि सनी पाजी, मला वाटते की हे उत्कृष्ट आहे. परंतु मला हा सन्मान मिळाला. कारण मी इतक्या दिवसांनी काम केलं, याचा लोकांना आनंद झाला.'किंग खान'नं पुढं म्हटलं, "मला कोणीतरी आठवण करून दिली की, चित्रपटात पैसे गुंतवणं महत्त्वाचे आहे. म्हणूनच मला गौरीचे आभार मानायचे आहेत. ती पतीवर अधिक खर्च करणारी पत्नी आहे." आर्यन खान प्रकरणाचा संदर्भ देत त्यानं सांगितलं, "जवान बनवताना आम्ही कठीण काळातून जात होतो."