महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रहमाननच्या आवाजातील एक गाणं ऐकताना त्याची पत्नी सायराला आजही कोसळतं रडू

रहमान आणि त्याची पत्नी सायरा लग्नाच्या 29 वर्षानंतर वेगळे झाले. सायराला रहमानच्या आवाजातील एक गाणं ऐकताना नेहमी रडू कोसळतं, असं तिनंच म्हटलं होतं.

AR Rahmanan
संगीतकार ए.आर. रहमान (ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 12:39 PM IST

मुंबई - संगीतकार ए.आर. रहमान आणि त्याची पत्नी सायरा यांच्या घटस्फोटाच्या बातमीनं अनेकांना आश्चर्य वाटलं. त्यांच्या लग्नाला 29 वर्ष पूर्ण झाली असताना त्यांनी घेतलेला विभक्त होण्याचा निर्णय रहमानच्या चाहत्यांसाठी धक्कादयक होता. त्यांच्या विभक्त होण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी भावनिक मतभेदांमुळे त्यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे.

रहमान पत्नीपासून वेगळा होतोय ही बातमी ऑनलाईन प्रसिद्ध झाल्यानंतर चाहते त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. मात्र दस्तुरखुद्द ए आर रहाननंच या बातमीला दुजोरा दिला तेव्हा केवळ हळहळ व्यक्त करण्यापलीकडे लोकांच्या हातात काही उरलं नाही. रहमाननं अत्यंत दुःखी मनानं ही बातमी चाहत्यांना कळवल्याचं, त्याच्या पोस्टवरुन दिसतं. त्याच्या प्रत्येक यशामध्ये पत्नी सायरा त्याच्या सावलीसारखी उभी असल्याचं तमाम चाहत्यांनी पाहिलंय.

खरंतर ए आर रहमानच्या प्रत्येक व्यावसायिक गोष्टींमध्ये सायरा यांचं लक्ष होतं. त्या त्याच्या मॅनेजर म्हणून सर्व व्यवहार पाहात असंत. सायरा यांनीच त्याचा खर्च, आर्थिक करार आणि चेन्नई आणि मुंबई येथील त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचं मॅनेजमेंट पाहिलं होतं. यामुळे रहमान यांना व्यवहारात फसवणं सायरा यांच्यामुळेच शक्य नव्हतं, असंही म्हटलं जात असे.

2018 मध्ये रहमान यांच्या जीवनावर आधारित चरित्र 'नोट्स ऑफ अ ड्रीम: द ऑथोराइज्ड बायोग्राफी ऑफ ए.आर. रहमान' प्रसिद्ध झालं होतं. या बायोग्राफीचे लेखक कृष्णा त्रिलूक यांच्याशी झालेल्या चर्चेत सायरा यांनी रहमान यांच्या संगीताबद्दल आणि त्याच्या खासगी गोष्टीबद्दल सविस्तर सांगितलं होतं. एआर रहमान यांचे एक गाणे आपल्याला नेहमी ऐकताना रडू कोसळतं असं सायरा म्हणाल्या होत्या. हे गाणं जेव्हाही ती ऐकते तेव्हा तिला आपल्या दिवंगत आईची आठवण येते असा उल्लेख त्यांनी या चर्चेदरम्यान केला होता.

रहमानच्या आवाजातील 'जाने की जीद ना करो' हे गाणं ऐकताना तिला आजही रडू कोसळतं. हे गाणं ऐकताना आपल्याला नेहमी आईची आठवण येते, असं ती म्हणाली होती. ही त्याची रचना नव्हती परंतु ज्या पद्धतीनं त्यानं हे गाणं गायलं होतं त्याला जगात तोड नव्हती, असं सायरा म्हणाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details