महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक पांड्या कोणाला करत आहे डेट? वाचा सविस्तर - HARDIK PANDYA - HARDIK PANDYA

Hardik Pandya Dating British Singer : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या घटस्फोटानंतर त्याच्या नवीन नात्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक हा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगानं पसरत आहेत. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यातच तो सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.

Hardik Pandya Dating British Singer
हार्दिक पांड्या डेटिंग ब्रिटिश सिंगर (हार्दिक पांड्या (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 6:17 PM IST

मुंबई - Hardik Pandya Rumoured GF : अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या ग्रीसमध्ये आहे. तो एका परदेशी मुलीबरोबर आपल्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. आता अलीकडेच त्यानं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की, हार्दिक एका परदेशी मुलीला डेट करत आहे. हार्दिकचे चाहते त्याच्या नवीन प्रेयसीबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्याच्या अधिकृत इंन्स्टाग्रामवर त्यानं ग्रीसमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो धमाकेदार स्टाईलमध्ये पूलसाइडकडे चालताना दिसत आहे. व्हिडिओत मागे मायकोनोस लँडस्केपचे एक सुंदर दृश्य आहे.

हार्दिक पांड्याची कोण आहे गर्लफ्रेंड : हार्दिक हा जास्मिन वालियाला डेट करत असल्याचं समजत आहे. हार्दिकच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव जास्मिननं केला आहे. दरम्यान, सोशल मीडिया युजर्सच्या लक्षात आलं की चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी जस्मिननं निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये काही फोटो शेअर केले होते. हार्दिक आणि जस्मिनच्या एकाच ठिकाण असल्याचं अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून म्हणताना दिसत आहेत. आता या दोघांच्या डेटिंगच्या अफवांना उधाण आलं आहे. जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि अभिनेत्री आहे. तिनं आपल्या आवाजानं म्यूझिक इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे. जस्मिनचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत.

जास्मिन वालियानं दिली हार्दिकच्या पोस्टवर प्रतिक्रिया :जास्मिन पहिल्यांदा ब्रिटीश रिॲलिटी टीव्ही सीरीज 'द ओनली वे इज एसेक्स (TOWIE)मध्ये दिसली होती. या सीरीजनंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. 2014 मध्ये जस्मिननं तिचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. यूट्यूबवर तिच्या गाण्यांचे अनेक व्हिडिओ आहेत. जॅस्मिननं जॅक नाइट, इंटेन्स-टी आणि ऑली ग्रीन म्यूझिक या कलाकारांबरोबरही काम केलय. 2017 मध्ये 'बॉम डिग्गी डिग्गी' या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. हे गाणे जॅक नाईटबरोबर जास्मिननं गायलं होतं. जस्मिननं 'बिग बॉस 13'च्या फायनलिस्ट असीम रियाझबरोबर 2022 म्यूझिक व्हिडिओ 'नाइट्स एन फाईट्स'मध्ये देखील काम केलं आहे. दरम्यान हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया देखील एकमेकांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. दोघांच्या पोस्ट रिॲक्शनवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, ते जुलै 2024 पासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी चार वर्षांच्या नात्यानंतर 18 जुलै रोजी वेगळे होण्याची घोषणा केली. हार्दिक आणि नताशा 2020 मध्ये विवाहबद्ध झाले होते.

हेही वाचा :

  1. हार्दिक पांड्यापासून वेगळे झाल्यानंतर एक्स बॉयफ्रेंड अली गोनीनं केला नताशा स्टॅनकोविकवर प्रेमाचा वर्षाव - Natasa Stankovic Ex Boyfriend
  2. हार्दिक पांड्यानं मुलाच्या वाढदिवसानिमित्त केली हृदयस्पर्शी पोस्ट, पाहा व्हिडिओ - Natasa Hardik Son Birthday
  3. हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर, नताशा स्टॅनकोविकने मुलगा अगस्त्यसह दिली सर्बियातील संग्रहालयाला भेट - NATASA STANKOVIC

ABOUT THE AUTHOR

...view details