महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ग्लोबल गायक एड शीरनने 'किंग खान' आणि गौरी खानसाठी केला परफॉर्मन्स, 'मन्नत'मधील व्हिडिओ व्हायरल - Ed Sheeran performs for SRK

ग्लोबल सिंगर एड शीरन काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला भेटण्यासाठी त्याच्या 'मन्नत' बंगल्यात गेला होता. इथं त्यानं किंग खान आणि त्याची क्वीन गौरी खानसाठी गाणं गायलं. त्याचा व्हिडिओ गौरीनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Global singer Ed Sheeran
ग्लोबल गायक एड शीरन

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 12:05 PM IST

मुंबई- ग्लोबल गायक एड शीरन सध्या भारतात आलाय. आशियाच्या दौऱ्यावर असलेला हा गायक फिलिपिन्स बेटांवर शानदार कॉन्सर्ट केल्यानंतर मुंबईत दाखल झालाय. मुंबई शहरात तो सध्या पाहुणचार घेत असून वेगवेगळ्या स्थळांनाही भेटी देतो. मुंबईतील शाळेला भेट देऊन त्यानं विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांचे परफॉर्मन्स त्याने पाहिले, त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्यासाठी परफॉर्मन्सही सादर केला. हे सर्व करत असताना त्याच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान आणि ओसंडून वाहणारा उत्साह त्याला खूप सकारात्मक उर्जा देणारा आहे.

अलिकडेच त्यानं शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यावर जाऊन खान परिवाराचा पाहुणार घेतला. यजमान गौरी, शाहरुख आणि त्यांची मुले यांच्यासाठी त्यानं हातात गिटार पकडली आणि खास परफॉर्मन्सही केला. गौरी खानने एड शीरनच्या या खास भेटीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये शीरन मन्नतमध्ये खान खानदानासाठी परफॉर्मन्स करताना दिसत आहे. गौरीने त्याच्या बरोबरचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात गौरी गौरी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती, तर पांढरा टी-शर्ट आणि निळ्या डेनिम जॅकेटमध्ये एड शीरन छान दिसत होता. त्यानं आर्यन खानचा नवीन ब्रँड असलेला X लोगोचे जॅकेट घातल्याचं दिसत आहे.

शाहरुख खान आणि एड यांनी इंस्टाग्रामवर एकत्र एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख गायक एड शरीनला त्याची सिग्नेचर पोज शिकवताना दिसत आहे. चित्रपट निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खानने हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला.

आशियाच्या दौऱ्यावर असलेल्या एड शरीनचा 16 मार्च रोजी मुंबईत कॉन्सर्ट आहे. हजारो फॅन्सच्या उपस्थितीत तो शनिवारची रात्र संगीताच्या स्वरांनी सजवणार आहे. मुंबईच्या महालक्ष्मी रेकोर्सवर हा कार्यक्रम पार पडेल. मुंबईतील या इव्हेन्टसह शीरनचा हा आशिया दौरा पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमासाठी गेल्या काही दिवसापासून जय्यत तयारी केली जात आहे. देशभरातील त्याच्या तरुण फॅन्समध्ये कमालीचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी मुंबई शहराच्या दिशेन यायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा -

  1. आलिया भट्टच्या 31 व्या वाढदिवसानिमित्त आलिशान डिनर पार्टीचे आयोजन
  2. "सर्वांचा खूप अभिमान वाटला", म्हणत कियारा अडवाणीनं केलं पती सिद्धार्थच्या 'योद्ध्या'चं कौतुक
  3. Bhool Bhulaiya 3 Shoot: पाय फ्रॅक्चर असतानाही अनीस बज्मी करतोय 'भूल भुलैया 3' चे शुटिंग, कार्तिक आर्यनचा प्रेरणादायी अनुभव

ABOUT THE AUTHOR

...view details