मुंबई - Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग' पुन्हा एकदा म्युझिक इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. अनेक हिट गाणे दिल्यानंतर हनी सिंग म्युझिक इंडस्ट्रीतून अचानक गायब झाला. हनी सिंगचं म्युझिक इंडस्ट्रीतून बेपत्ता होण्यामागच कारण हे ड्रग्ज सेवन आणि कौटुंबिक कलह असल्याचं सांगितलं जात आहे. हनी सिंग जेव्हा ड्रग्जच्या आहारी गेला तेव्हा त्याची गाण्याची कारकीर्द ही समाप्त होण्याच्या मार्गावर होती. आजही हनी सिंग आपली जुनी ओळख परत मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. हनी सिंग अजूनही त्याच्या म्युझिक अल्बम्स आणि लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्यांचे मनं जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
हनी सिंगनं दिला सल्ला :आता एका कॉन्सर्टदरम्यान हनी सिंगनं त्याच्या चाहत्यांना एक मोठा सल्ला दिला आहे. हनी सिंग स्टेजवर परफॉर्म करत होता, तेव्हा त्यानं चाहत्यांना म्हटलं, ''भगिनींनो आणि भावांनो, गांजा ओढू नका, माझ्या आयुष्यातील पाच वर्षे वाया गेली, तुम्हाला दारू प्याची असेल तर तुम्ही पिऊ शकता मात्र चरस आणि गांजापासून दुर राहा.'' हनी सिंगचे हे शब्द त्याच्या मनातून आले आहेत. गांजामुळे त्याचे आयुष्य वाईट टप्प्यात गेले तर सामान्य लोकांचे काय होईल हे हनी सिंगला समजलं, त्यानंतर त्यानं चाहत्यांना याबद्दल सांगितलं. हनी सिंग हा म्युझिक इंडस्ट्रीत हा टॉपवर होता, मात्र त्याच्या एका चुकीमुळे तो म्युझिक इंडस्ट्रीतून मागे पडला.