महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अब इंतजार हुआ खतम...सलमानच्या 'सिकंदर'ची पहिला झलक आली, शत्रूचा निःपात करण्यासाठी भाईजान सज्ज - SALMAN KHAN SIKANDER FIRST LOOK

सलमान खानचा बहुप्रतीक्षित सिकंदरचा पहिला टीझर लॉन्च झाला आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन मोडमधला सलमान यात दिसत आहे.

First look of Salman's Sikander out
सलमानच्या 'सिकंदर'ची पहिला झलक (SIKANDER TEASER screen grab)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 28, 2024, 7:29 PM IST

मुंबई - सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाची पहिली झलक आज लॉन्च करण्यात आली. अपेक्षेनुसार चाहत्यांना खूश करण्यात निर्माता यशस्वी झाल्याचं या टीझरवरुन लक्षात येतंय. बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून असलेली सलमानची ओळख पुन्हा प्रस्थापिक करण्यासाठी तो खूप आग्रही आहे. मधल्या काळात त्याला अपेक्षित यश मिळालं नसल्यानं 'सिकंदर'कडून त्याला फार मोठ्या अपेक्षा आहेत. सलमानला भव्य पडद्यावर पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी दिग्दर्शक एआर मुरुगादास आपलं कसब पणाला लावताना या सिनेमात दिसत आहे.

कसा आहे 'सिकंदर'चा टीझर?

नाडियादवाला ग्रँडसन निर्मिती 'सिकंदर' चित्रपटाचा पहिला टीझर सलमानच्या वाढदिवसानिमित्त लॉन्च करण्यात आला आहे. 1 मिनीट 41 सेकंदाच्या या टीझरमध्ये सलमान खान एका शस्त्रागारात प्रवेश करताना सुरुवातीला दिसतो. या शस्त्रागारामध्ये धरदार शस्त्र आणि विविध प्रकारच्या बंदुका दिसतात. यामध्ये शिरस्त्राण आणि चिलखत घातलेले पुतळे आक्रमक होऊन सलमानवर बंदुका ताणतात. या सर्वांचा भाईजान काही क्षणात फडशा पाडतो आणि एक जबरदस्त अ‍ॅक्शन मोडमधल्या सलमान आपल्याला दिसतो.

'सिकदंर'ची ही झलक पाहण्यासाठी त्याचा चाहते खूप आतुर झाले होते. टीझर रिलीज झाल्यानंतर त्याच्या आनंदाला उधाण आल्याचं प्रतिक्रियावरुन दिसत आहे. "सुना है की बहोत सारे लोग मेरे पिछे पडे हैं, बस मेरे मुडने की देर है", हा सलमान खानचा डायलॉग या टीझरमधून हायलाईट झाला आहे. याचं जोरदार स्वागत चाहत्यांनी केलंय. मास अ‍ॅक्शन मोडमधील सलमानला पाहून 'ईदच्या सेलेब्रिशनला सुरुवात' झाल्याचं एका चाहत्यानं म्हटलंय. "तो परत आला आहे आणि नेहमीपेक्षा चांगला आहे! किती आग पसरवणारा टीझर आहे...त्याचा लूक, त्याचे संवाद आणि ते किलर BGM यात परिपूर्णता आहे. सलमान खान पुन्हा एकदा सिकंदरच्या भूमिकेत आला आहे! या साठी प्रतीक्षा करू शकत नाही." असं एकानं म्हटलंय

'सिकंदर' या चित्रपटाची रिलीज डेट आधीच निश्चित करण्यात आली आहे. 'सिकंदर' हा चित्रपट २०२५ च्या ईदच्या मुहूर्तावर जगभर प्रदर्शित होणार आहे. 'सिकंदर' ईदच्या पार्श्वभूमीवर मार्च 2025 ला थिएटरमध्ये येण्यासाठी सज्ज आहे. आमिर खानसह 'गजनी' हा चित्रपट करणारे साऊथचे दिग्दर्शक एआर मुरुगादास यांनी 'सिकंदर'चं दिग्दर्शन केलं आहे. 'सिकंदर'चा निर्माता साजिद नाडियादवाला आहे हा सलमान खानचा जवळचा मित्र आहे. या चित्रपटात सलमान खानबरोबर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल देखील या चित्रपटात दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details