महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

गुलजार, तुषार कपूर, प्रेम चोप्रांसह दिग्गज सेलेब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क - BOLLYWOOD CELEBRITIES VOTED

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिग्गज सेलेब्रिटींनी मतदान केलं. गीतकार गुलजार, प्रेम चोप्रा, सलमान खानचे वडिल यांच्यासह अनेक सेलेब्रीटी मतदान करताना दिसले.

BOLLYWOOD CELEBRITIES VOTED
सेलेब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क (ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 20, 2024, 3:45 PM IST

Updated : Nov 20, 2024, 4:04 PM IST

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला आज सकाळपासून उत्साहनं सुरुवात झाली. मुंबईत दिग्गज सेलेब्रिटीही यामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. ज्येष्ठ गीतकार गुलजार आणि त्यांची मुलगी, चित्रपट दिग्दर्शक मेघना गुलजार मतदान करण्यासाठी बुधवारी मुंबईतील मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मेघना यांनी नागरिकांना घराबाहेर पडून मतदान गांभीर्याने करण्याचे आवाहन केले. "सहा महिन्यांपूर्वी आम्ही देशासाठी बाहेर पडलो, आता आम्ही आमच्या राज्यासाठी बाहेर पडलो आहोत. मतदान करणे ही तुमची जबाबदारी आहे आणि तुमचा अधिकार आहे. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली नाही तर तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार नाही," असं मेघना म्हणाली.

ज्येष्ठ गीतकार गुलजार आणि त्यांची मुलगी मेघना गुलजार (ANI)

अभिनेता तुषार कपूरनेही मुंबईतील एका मतदान केंद्रावर मतदान केले आणि निवडणुकीत भाग घेण्याचे महत्त्व पटवून दिले. "अनेक लोक मतदान करत नाहीत कारण त्यांना राजकारणात रस नसतो. परंतु आपल्याला आपल्या शहराचा आणि आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे आणि आपण लोकशाहीला जपली पाहिजे. हे आपण करू शकतो... प्रत्येक मत महत्त्वाचे आहे," असे तुषार कपूर म्हणाला.

तुषार कपूर (ANI)

यावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांनीही मतदानाचा सराव केला. आपल्या मतदान केंद्रावरील सुरळीत व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करताना प्रेम चोप्रा म्हणाले, "मतदान केंद्रावरील व्यवस्था खूपच छान आहे... माझ्याकडे घरून मतदान करण्याचा पर्याय होता, तरीही मी सर्वांप्रमाणे मतदान करण्यासाठी येथे आलो आहे."

प्रेम चोप्रा (ANI)

अभिनेता राजकुमार राव मतदान करणाऱ्या पहिल्या बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, "मत देणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने कृपया बाहेर पडून मतदान करा. हा मतदानाचा दिवस आहे, तो खूप महत्त्वाचा आहे."

राजकुमार राव (ANI)

आपल्या सहकारी सेलिब्रिटींसोबत मतदान करणाऱ्या ईशा कोप्पीकरनंही आपल्या मुलांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्याची पालकांची जबाबदारी अधोरेखित केली. संजय दत्तची बहीण, लोकसभेच्या माजी सदस्या प्रिया दत्त यांनीही मतदान प्रक्रियेत भाग घेतला आणि दुपारी मतदान केले.

त्याचप्रमाणे, सलमान खानचे आई-वडील, सलीम आणि सलमा खान यांसारखे बॉलिवूडचे दिग्गज, कडक सुरक्षा उपायांमध्ये मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. सलमानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान याने मतदान केल्यानंतर बोलताना म्हणाला, "मी वांद्र्याचा मुलगा आहे... जो कोणी जिंकेल त्याला वांद्रे आवडेल अशी मी आशा करतो तसेच वांद्रेकरांनाही तो आवडेल. चांगले राजकारणी जिंकतील अशी मला खात्री आहे. मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे प्रत्येकाला मतदान करण्याची मी विनंती करतो.", असं तो म्हणाला.

या दिग्गजांच्या व्यतिरिक्त, सुभाष घई, निकिता दत्ता आणि आमिर खानची माजी पत्नी रीना दत्ता यांच्यासह इतर अनेकांनीही मतदानाचा हक्क बजावला. दिवसाच्या सुरुवातीलाच सोनू सूद, अक्षय कुमार, राजकुमार राव आणि जेनेलिया देशमुख यांसारख्या इतर स्टार्सनी मतदानात भाग घेतला आणि नागरिकांना सामील होण्याचं आवाहन केलं.

Last Updated : Nov 20, 2024, 4:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details