मुंबई :अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'किंग खान'नं 2023 मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला होता. दरम्यान सोशल मीडियावर शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात शाहरुख हा आपल्या कुटुंबाबरोबर मक्का मदिना येथे दिसत आहे. आता 'किंग खान' खरच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मक्का मदिनाला गेला होता का ? असा सवाल, त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून करत आहेत. याशिवाय 'किंग खान'नं देखील मक्का मदिना येथील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत.
शाहरुख खान मक्का मदिनाला गेला ? :व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन खानबरोबर असल्याचा दिसत आहे. फोटोत शाहरुख खान आणि आर्यन खान यांनी पांढरा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. दुसरीकडे गौरी खानबद्दल बोलायचं झालं तर तिनं ग्रे कलरच्या हिजाब घातला आहे. शाहरुखचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. आता या फोटो मागे एक सत्य दडलेलं आहे. शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचा हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं तयार केला गेला आहे. एआय तंत्रज्ञानाद्वारे शाहरुख खान हा अनेकदा डीपफेकचा बळी ठरत आहे. यापूर्वी देखील त्याचे असेच काही फोटो व्हायरल झाले होते.