महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी,आक्षेपार्ह संवाद हटवण्याचे निर्देश - Hamare Baarah Movie - HAMARE BAARAH MOVIE

Hamare Baarah Movie : वादात अडकलेल्या 'हमारे बारह' चित्रपटाला अखेर मुंबई उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दिला आहे. चित्रपटात काहीही वादग्रस्त नाही, तसंच सामाजिक संदेश देणारा असाच हा चित्रपट आहे, असं न्यायालयानं नमुद केलं. वाचा सविस्तर...

Mumbai HC allows release of Hamare Baarah
'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 9:47 AM IST

मुंबई Hamare Baarah Movie:वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'हमारे बारह' चित्रपटाला अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानं चित्रपट पाहिला. त्यानंतर मंगळवारी सुमारे चार तास सुनावणी झाल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यात आली. याबाबत सविस्तर निकाल बुधवारी देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरोझ पुनीवाला यांच्या खंडपीठानं दोन्ही पक्षांना सामंजस्य करार करण्याचं निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होण्यामधील अडथळे संपुष्टात आले.

काय होतं वाद:या चित्रपटात 'आय विल किल यू, अल्लाह हो अकबर' असा एक संवाद आहे. त्यातील 'अल्लाह हो अकबर' हा उल्लेख वगळण्याचे निर्देश खंडपीठानं दिला आहे. तसंच चित्रपटाचा टिझर-ट्रेलर सेन्सॉर बोर्डाच्या परवानगी शिवाय प्रदर्शित केल्याप्रकरणी निर्मात्यांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. टिझर-ट्रेलर न्यायालयाच्या निर्देशानंतर वगळण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर इस्लामिक भावना दुखवणारा आहे. तसंच मुस्लिम महिलांचा अपमान करणारा असल्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी, मागणी करणारी याचिका पुण्यातील अझहर तांबोळी यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून टीझर हटवण्याचे निर्देश दिले होते आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हा चित्रपट पाहून निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मयूर खांडेपारकर, अ‍ॅड. रेखा मुसळे, अ‍ॅड. नितीन राजगुरु यांनी काम पाहिले. तर, चित्रपटाचे निर्माते रवी गुप्ता यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. राहुल नारिचानिया, सेन्सॉर बोर्डातर्फे अ‍ॅड. अद्वैत सेठना, आशुतोष मिश्रा यांनी, राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. कविता सोळुंके यांनी, तसंच हस्तक्षेप याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. युसूफ मुछाला, सगीर खान, अफशा खान, अ‍ॅड. फझलुरहेमान, अ‍ॅड. शान इलाही यांनी काम पाहिलं. या प्रकरणात दोन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

टीझर अत्यंत अयोग्य

न्यायालयानं नमूद केलं की, चित्रपटात काहीही वादग्रस्त नाही. सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे. काही आक्षेपार्ह शब्द आणि दृश्ये काढून टाकण्यात यावीत. खंडपीठानं चित्रपट पाहिला असून त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही. चित्रपट न बघता टिप्पणी करणं चुकीचं असल्याचही न्यायालयानं याचिकाकर्त्याच्या वकीलाला सागितलं. मात्र, टीझर अत्यंत चुकीचा आणि वादग्रस्त असल्याचं ते म्हणाले. मात्र, तो काढून टाकण्यात आला आहे. कुराण मधील आयतचा चुकीचा अर्थ काढून महिलांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्या पुरुषाचा हा चित्रपट आहे. सेन्सॉर बोर्डानं आमच्यापूर्वी काही बदल सुचवले आहेत.

हेही वाचा

  1. जातीय तणाव टाळण्यासाठी कर्नाटकात 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी - Hamare Barah
  2. मोठी बातमी! 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी - Hamare Baarah

ABOUT THE AUTHOR

...view details