मुंबई - Elvish Yadav post : बिग बॉस ओटीटी विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. एल्विशच्या जामिनसाठी एनडीपीएसच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. एल्विशला कोर्टाकडून 50-50 हजार रुपयांच्या बेल बॉन्डवर जामीन मिळाला आहे. एल्विशला नोएडा पोलिसांनी सापाच्या विषाची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर अनेक काही गोष्टी समोर आल्या होत्या. अटकेनंतर बक्सर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर एल्विश यादवनं सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
एल्विश यादवची सोशल मीडिया पोस्ट : तुरुंगातून सुटल्यानंतर एल्विशनं त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत, तो काळ्या स्लीव्हलेस जॅकेटसह पांढरा शर्ट आणि निळ्या डेनिम जीन्समध्ये लक्झरी कारच्या बाजूला उभा असल्याचा दिसत आहे. या पोस्टवर 'बिग बॉस 17' फेम अभिषेक डोवालनं लिहिलं, 'भाऊ, तुम्हाला पाहून खूप आनंद झाला'. तर काही चाहत्यांनी 'किंग इज बॅक' असं या पोस्टवर लिहिलं आहे. एल्विशनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''वेळ दाखवू शकत नाही. पण आता खूप काही दिसू शकते.'' एल्विशनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो देखील शेअर केला आहे. यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना थम्ब्स अप देताना दिसत आहे.