मुंबई : इंग्लिश हिटमेकर एड शीरन सध्या त्यांच्या 'द मॅथेमॅटिक्स टूर'मुळे चर्चेत आहे. तो भारतात वेगवेगळ्या शहारांमध्ये शो करत आहे. हैदराबाद आणि बेंगळुरूनंतर, गायक बंगालमध्ये पोहोचला आहे. त्याच्या सादरीकरणापूर्वी, तो भारतातील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगला भेटला. आता या खास भेटीची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शीरननं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अरिजितच्या मूळ गावी जियागंजला भेट दिली. अरिजितनं शीरनला त्याच्या गावी खूप फिरविले. एड शीरन आणि अरिजीत सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अरिजित सिंग पुन्हा एकदा स्कूटी चालवताना दिसत आहे.
अरिजीत सिंगनं एड शीरनला दिली स्कूटीची सवारी :व्हिडिओत अरिजीत सिंगबरोबर स्कूटीवर मागच्या सीटवर हा एड शीरन असल्याचा दिसत आहे. अरिजीतनं शीरनला त्याच्या स्कूटरवरून जियागंजला नेलं. याशिवाय अरिजीतबरोबर त्याचे काही मित्र देखील वेगवेगळ्या स्कूटरवरून प्रवास करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एड शीरननं अरिजीतबरोबर सुमारे पाच तास घालवले. हे दोघेही फुलमोरहून भागीरथीच्या काठावर गेले. यानंतर शिबतळा घाटावर ते एका नावेत बसले आणि सुमारे एक तास नदीत फिरले. दोन्ही रॉकस्टार्सच्या या खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या कमेंट्स देत आहेत.