मुंबई- Arbaaz Khan on Malaika Arora : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा लग्नाच्या 19 वर्षांनंतर विभक्त झाले होते. दोघांनाही अरहान खान नावाचा सुंदर तरुण मुलगा आहे. अलीकडेच अरहानने त्याची 'डंब बिर्याणी' ही पॉडकास्ट मालिका लाँच केली. या शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये त्याची आई आणि सरजिता रैयानी सामील झाले आहेत. त्यांच्यातील संभाषणादरम्यान मलायका अरोरानं विनोदाने कमेंट केली की तिच्या मुलाकडे 'निर्णय' न घेण्याचा वडिलांचा गुण वारसा म्हणून मिळाला आहे.
या कमेंटला प्रत्युत्तर म्हणून अरबाज खानला एका न्यूजवायरला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आले की मलायकाच्या या कमेंटशी तो सहमत आहे का? यावर प्रतिक्रिया देताना अरबाज म्हणाला की, याबद्दलचा तिचा दृष्टीकोन समजला आणि तिनं बोलून दाखवलेल्या त्याच्याबद्दलच्या विचार स्पष्टता वगैरे सारख्या सकारात्मक गुणांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर द्यायचा ठरवलं आहे.
अरबाजने स्पष्ट केले की मलायकाचं मत तिचं स्वतःचे आहे आणि तो त्यावर 'विवाद' करू इच्छित नाही. आई आणि मुलगा यांच्यातील संभाषणाला त्यानं हलके फुलकं घेतलं म्हणत ते गांभीर्याने घेतले नाही. "हे गांभीर्याने घेण्यासारखे काहीही नाही. हा एक मनोरंजक चॅट शो आहे जो आई आणि मुलामध्ये आहे. याचाच अर्थ तिला काहीही बोलण्याचा अधिकार आहे. मला वाटले की ते ठीक आहे. मला काहीही वाद घालायचा नाही. हे तिचे मत आहे," असं अरबाज म्हणाला.