मुंबई - नागपूरच्या जगप्रसिद्ध डॉली चायवालाची सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस 18' मध्ये एन्ट्री झाली आहे. डॉली चायवालाने स्वतः ही माहिती आणि त्याचा फोटो इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केला आहे. डॉली याच्याबरोबरच दोन स्टार गेस्टची झलक आजच्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सलमान खान काही काळ शोपासून दूर राहिला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या पदरात थोडी निराशा पडली होती. आता सलमान खानने 'वीकेंड का वार' या चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली असून या आठवड्यात सलमान खान 'विकेंड का वार'मध्ये तो दिसणार असल्याचा चाहत्यांना याचा खूप आनंद झाला आहे. 'भारत पे' या कंपनीचे संस्थापक आणि 'शार्क टँक इंडिया'चे एक्स जज अश्वीर ग्रोव्हर यांनी या शोमध्ये प्रवेश केला आहे.
'डॉली चायवाला'ने स्पर्धकांसाठी बनवला चहा - 'बिग बॉस 18' च्या 'वीकेंड का वार'च्या प्रोमोमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेली बेसूर गायिका खुशीची एन्ट्री झालेली दिसते. ती आपल्या बेसूर गाण्यांनी 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांचं डोक दुखवताना दिसते. यानंतर डॉली चायवाला शोमध्ये प्रवेश करतो आणि शोमधील स्पर्धक बग्गा याच्याबरोबर चहा बनवतो आणि घरातील सदस्यांना पाजतो. प्रोमोच्या अखेरीस 'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हर सलमानच्या समोर उभं राहतो आणि सलमान खानच्या प्रश्नांच्या तोफेला सामोरं जातो.