मुंबई - Divya khosla and bhushan kumar :अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माता भूषण कुमारची पत्नी आहे. भूषण आणि दिव्या यांचा प्रेमविवाह आहे आणि दोघांनी नेहमीच वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या एकमेकांना सपोर्ट केला आहे. आता या दोघांमध्ये काही बरोबर नसल्याची बातमी समोर आली आहे. रेडिटवरची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये या दोघांमध्ये ठीक नसल्याचे म्हटले जात आहे. आता चाहत्यांच्या लक्षात आलं की दिव्यानं इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या नावामधून कुमार आडनाव काढून टाकले आहे. याशिवाय तिनं नवऱ्याची कंपनीला देखील सोशल मीडियावर अनफॉलोही केले आहे.
टी-सीरीज अनफॉलो केलं : रेडिटवर यूजर्सनं पोस्ट शेअर करून दिव्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यावरून दिसून येत आहे की, दिव्यानं टी-सीरीज अनफॉलो केलंय. याशिवाय दिव्याने तिच्या कुमार आडनाव देखील काढून टाकल्याने आता अनेकजण तिचा घटस्फोट झाला असल्याचे समजत आहेत. दरम्यान 2018 मध्ये एका महिलेने भूषण कुमारवर गंभीर आरोप केले होते. मी टू ( MeToo ) अंतर्गत हे आरोप केल्यानंतर दिव्यानं आपल्या पतीचे समर्थन करत म्हटले होत की, 'माझ्या पतीनं टी-सीरिजला आज इथे आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मी नेहमी माझ्या पतीच्या पाठीशी उभी आहे. लोक कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करतात हे अतिशय दुःखद आहे.''