महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दिशा पटानीच्या वाढदिवसानिमित्त 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी फर्स्ट लूक पोस्टर केलं रिलीज - disha patani - DISHA PATANI

Disha Patani : दिशा पटानीचा आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी तिचं चित्रपटामधील फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं आहे.

Disha Patani
दिशा पटानी (दिशा पटानी बर्थडे (IMAGE- IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 2:05 PM IST

मुंबई - Disha Patani :आज 13 जून रोजी दिशा पटानी तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्यानिमित्तानं 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर शेअर करून दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता प्रभास स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'कल्की 2898 एडी'मधील दिशा पटानीचा फर्स्ट लूक पोस्टर हे खूप दमदार आहे. या पोस्टरद्वारे या चित्रपटामधून तिच्या पात्राचे नाव देखील समोर आलं आहे. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टरमध्ये ती बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "आमच्या रॉक्सीला वाढदिवसाच्या शुभेच्छा."

दिशा पटानीचं 'कल्की 2898 एडी'मधील पोस्टर झालं रिलीज :दिशा पटानी तिच्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये काळ्या लेदरच्या पोशाखात दिसत आहे. तिनं हातात काळ्या लेदरचे ग्लोव्हजही घातले आहेत. अलीकडेच, 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यात दिशा पटानीची झलकही पाहायला मिळाली होती. या चित्रपटात प्रभास आणि दिशा पटानी व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत. कमल हासन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'कल्की 2898' एडी या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 27 जून रोजी जगभरात रिलीज होणार आहे.

'कल्की 2898 एडी' चित्रपटाबद्दल :दरम्यान, काल बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी प्रभासची ॲक्शन कार बुज्जी चालवली होती. यानंतर ते खूप चर्चेत आले. त्यांनी देखील या चित्रपटाबद्दल कौतुक केलं आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन अश्वत्माच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच दीपिका पदुकोण ही सुमतीची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलंय. ट्रेलरवरून कळते की कलयुग संपल्यानंतर, दीपिका (सुमती)च्या पोटी कल्की जन्माला येईल. या चित्रपटाची कहाणी खूप मनोरंजक असणार आहे. सोशल मीडियावर 'कल्की 2898 एडी' चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. आता दिशा पटानीच्या व्हायरल होत असलेल्या पोस्टरवर यूजर्स कमेंट्स करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बॉर्डर 2'ची घोषणा, 27 वर्षांनंतर सनी देओल त्याच्या 'जवानां'सह परतणार - Sunny Deol to
  2. करण ओबेरॉयनं मोना सिंगबरोबरच्या ब्रेकअपबद्दल 18 वर्षांनी केला खुलासा - Karan Oberoi
  3. गोळीबार प्रकरणी सलमान आणि अरबाज खानचे पोलिसांनी नोंदवले जबाब - Salman Khans statement

ABOUT THE AUTHOR

...view details