मुंबई -Diljit Dosanjh and Justin Trudeau : पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील स्टार दिलजीत दोसांझसाठी 2024 हे वर्ष सर्वात खास ठरलं आहे. या वर्षात दिलजीत दोसांझनं आपल्या कॉन्सर्ट आणि गाण्यांद्वारे जागतिक स्तरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. याशिवाय परिणीती चोप्राबरोबरच्या 'चमकिला' चित्रपटातूनही तो देशात चमकला. यानंतर, दिलजीत करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू अभिनीत 'क्रू' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. आता दिलजीत दोसांझच्या चाहत्यांसाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. दिलजीत कॅनडामध्ये त्याच्या एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना अचानक कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी स्टेजवर त्याला अचानक भेट दिली. यानंतर तो चर्चेत आला आहे.
दिलजीत दोसांझला कॅनडा कॉन्सर्टमध्ये पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिली अचानक भेट - diljit dosanjh - DILJIT DOSANJH
Diljit Dosanjh and Justin Trudeau : दिलजीत दोसांझला कॅनडा कॉन्सर्टमध्ये पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी अचानक भेट देऊन थक्क केलं. आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत, यात दिलजीत जस्टिन ट्रूडो यांना शेकहॅन्ड करताना दिसत आहे.
Published : Jul 15, 2024, 12:39 PM IST
दिलजीत दोसांझची घेतली पंतप्रधान जस्टिन ट्रूडोनं भेट :कॅनडाचे पंतप्रधान अचानक स्टेजवर पोहोचल्यानं दिलजीत हा चकित झाला. जस्टिन ट्रूडोनं मंचावर दिलजीत आणि त्याच्या ग्रुपबरोबर अनेक फोटो क्लिक केले. यावेळी तो त्याच्या पंजाबी फ्री स्टाईल लूकमध्ये स्टेजवर दिसला. त्यानं पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी शेकहॅन्ड केले. दरम्यान खुद्द पंतप्रधानांनी दिलजीतबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. ही फोटो शेअर करताना पीएम जस्टिन ट्रूडो यांनी लिहिलं की, "दिलजीतला त्याच्या शोपूर्वी शुभेच्छा देण्यासाठी रॉजर्स सेंटरमध्ये पोहोचलो, कॅनडा एक उत्तम देश आहे, जिथे पंजाबचा प्रत्येक मुलगा इतिहास घडवू शकतो आणि सोल्ड आउट करू शकतो."
दिलजीत दोसांझचे चाहते खुश :व्हायरल झालेल्या फोटोवर अनेकजण कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. या फोटोवर त्यानं एका लिहिलं, "तो इंडियन आहे आणि याचा आम्हाला गर्व आहे." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, "सर्वात चांगला कलाकार दिलजीत आहे." आणखी एकानं लिहिलं, "दिलजीत दोसांझ हा खूप छान गाणं गातो." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. तसेच काही चाहते जस्टिन ट्रूडोला ट्रोल देखील करत आहेत. काहीजणाच्या मते जस्टिन ट्रूडो हा पंजाबी वोटसाठी सर्व काही करत असल्याचं म्हणत आहे.