महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

इंदूर कॉन्सर्टदरम्यान ब्लॅक तिकिटांवर दिलजीत दोसांझनं दिली 'ही' प्रतिक्रिया... - CONCERT TICKETS

पंजाबी गायक दिलजीत दोसांझनं आपल्या इंदूर कॉन्सर्टदरम्यान ब्लॅक तिकिटांवर प्रतिक्रिया दिली.

Diljit Dosanjh
दिलजीत दोसांझ (दिलजीत दोसांझ (IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 9, 2024, 1:32 PM IST

मुंबई : पंजाबी गायक दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या 'दिल लुमिनाटी टूर'मुळे चर्चेत आहे. त्यानं त्याच्या लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. अलीकडेच, त्याच्या इंदूरच्या कॉन्सर्टमधील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यामध्ये तो, त्या लोकांबद्दल सांगत आहे, ज्यांनी त्यांच्या कॉन्सर्टची तिकिटे ब्लॉकमध्ये विकली. याशिवाय त्यानं त्यांच्यावर टीका देखील केली. दिलजीतनं देखील त्याचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. राहत इंदोरी साहबच्या नावानं दिलजीतनं त्याचा कॉन्सर्ट इंदूर केला होता.

कलाकाराचा काय दोष - दिलजीत :दिलजीतनं शेअर केल्या व्हिडिओमध्ये म्हटलं, "बऱ्याच काळापासून आपल्या देशात माझ्या विरोधात एक ट्रेंड चालू आहे की,कॉन्सर्टची तिकिट ब्लॅकमध्ये विकली जात आहेत. 10 रुपयांचे तिकिट खरेदी करून ते लोक 100 रुपयांना विकत असेल तर, त्यात कलाकारांचा काय दोष?" यानंतर दिलजीत राहत इंदोरीजींची शायरी म्हणून लोकांचे मनोरंजन करतो.

दिलजीत दोसांझनं आरोपांचं केलं खंडण :या व्हिडिओमध्ये त्यानं भारतीय मीडियावाल्यांना उद्देशून म्हटलं, "मीडियावाले, तुम्हाला हवे तेवढे आरोप करा. मला बदनामीची भीती वाटते नाही. मी याबद्दल कोणतेही टेन्शन घेत नाही. हे आतापासून थोडे सुरू झाले आहे. जेव्हापासून भारतात सिनेमा आला आहे, तेव्हापासून '10 का 20'मध्ये तिकिटे विकली जात आहे." यानंतर त्यानं गायक एपी ढिल्लन आणि करण औजला यांच्या सध्या सुरू असलेल्या शोबद्दल म्हटलं, "माझे दोन भाऊ आणि करण औजला आणि एपी ढिल्लन यांचा टूर सुरू आहे, त्यांनाही शुभेच्छा. हा स्वतंत्र संगीताचा काळ आहे. क्रांती करायची असेल, तर संकटे येतात. आम्ही आमचे काम करत राहू. आता सर्व स्वतंत्र कलाकारांना त्यांचे प्रयत्न आणि मेहनत दुप्पट करावी लागेल, ही वेळ भारतीय संगीताची आहे. पूर्वी परदेशातून कलाकार यायचे, त्यांचे तिकिटे ब्लॅकनं लाखात विकली जात होती. आता भारतीय कलाकारांची तिकिटे ब्लॅकमध्ये विकली जात आहेत. याला वोकल फॉर लोकल'. म्हणतात."

इंदूरचा कॉन्सर्ट : तसेच दिलजीतनं त्याच्या इंस्टाग्रामवर इंदूरच्या कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं,'लव्ह यू इंदूर, खूप प्रेम. कालची मैफल राहत इंदोरी साहेबांच्या नावानं होती. लुमिनाटी टूर वर्ष 24'. या कॉन्सर्टदरम्यान दिलजीतनं इंदोरी साहेबांच्या चाहत्यांचेही आभार मानले. याशिवाय दिलजीतनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, यामध्ये चाहते त्याचा शो पाहण्यासाठी ट्रकवर चढताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. दिलजीत दोसांझच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये अचानक अवतरली दीपिका पदुकोण, पाहा मग पुढं काय घडलं
  2. दारुच्या गाण्यावर 'बंदी' लादण्यापूर्वी सिनेमातील सीन्सवर 'सेन्सॉरशिप' लादा, दिलजीत दोसांझनं दिलं आव्हान
  3. "उगं माझी कळ काढू नका, हिंमत असेल तर 'ड्राय डे' घोषित करा", दिलजीत दोसांझचं राज्य सरकारला चॅलेंज

ABOUT THE AUTHOR

...view details