महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'देवरा पार्ट 1'मध्ये जूनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत झळकणार, नवीन पोस्टर व्हायरल - jr ntr - JR NTR

Devara Countdown Poster: ज्युनियर एनटीआर सध्या 'देवरा: पार्ट 1' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

Devara Countdown Poster
देवरा काउंटडाउन पोस्टर (instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 27, 2024, 4:43 PM IST

मुंबई - Devara Countdown Poster: साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर स्टारर आगामी चित्रपट 'देवरा: पार्ट 1' थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. निर्मात्यांनी रिलीज होण्याच्या एक महिना आधी चित्रपटाचे काउंटडाउन पोस्टर लॉन्च केलंय. रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये ज्युनियर एनटीआरला नव्या अवतारात पाहायला मिळतं. 27 ऑगस्ट रोजी, 'देवरा: पार्ट 1'च्या निर्मात्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर चित्रपटामधील नवीन पोस्टर रिलीज केलंय. पोस्टरमध्ये ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये यावर लिहिलं आहे की, "एका महिन्यात त्याचं आगमन मोठ्या पडद्यावरील अविस्मरणीय अनुभवासह जगाला धक्का देईल. 27 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये त्याच्या मॅजेस्टिक मॅडनेसचा अनुभव घेऊ या.

'देवरा पार्ट 1'मध्ये ज्युनियर एनटीआर दिसणार दुहेरी भूमिकेत : 'देवरा पार्ट 1'मधील पोस्टरमध्ये ज्युनियर एनटीआरचे दोन अवतार दाखवले गेले आहेत. पहिल्या अवतारात तो रहस्यमय लूकसह लांब केसांच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. दुसऱ्या अवतारात छोट्या केसांच्या स्टाईलमध्ये तो आक्रमक अंदाजात दिसत आहे. पोस्टरमधील ज्युनियर एनटीआरच्या नवीन अवतारानं चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या रिलीजबाबतचा उत्साह वाढवला आहे. चाहत्यांनी कमेंट सेक्शन फायर आणि रेड हार्ट इमोजींनी शेअर करून, या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. हे पोस्टर चित्रपटाची नायिका जान्हवी कपूरनं देखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे.

सैफ अली खानची चित्रपटामधील भूमिका : अभिनेत्री सैफ अलीच्या वाढदिवशी, निर्मात्यांनी चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचा टीझर रिलीज केला होता आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सैफ अली खान या चित्रपटात भैराची भूमिका साकारणार आहे. 'देवरा: पार्ट 1'मध्ये ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. 'देवरा पार्ट 1' चं दिग्दर्शन कोराटला शिवा यांनी केलं आहे. हा चित्रपट 300 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. 'देवरा: पार्ट 1' एए फिल्म्स, धर्मा प्रोडक्शन्स, रेड जायंट मूव्हीजची संयुक्त निर्मिती आहे.

हेही वाचा :

  1. 'देवरा पार्ट 1'मधील 'धीरे धीरे' गाणं पाहिल्यानंतर जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडनं दिली 'ही' प्रतिक्रिया - devara part 1
  2. 'देवरा पार्ट 1' मेकर्सनं नवीन पोस्टर शेअर करून ज्युनियर एनटीआरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Jr NTR Birthday
  3. ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्टी 1'मधील 'फिअर' गाणं आज संध्याकाळी होणार रिलीज, पाहा पोस्ट - DEVARA PART 1

ABOUT THE AUTHOR

...view details