महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोणचा लूक पाहून चाहते झाले घायाळ - SANGEET CEREMONY - SANGEET CEREMONY

Deepika Padukone : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 5 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली. आता त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता अनेकजण दीपिकाच्या लूकचे कौतुक करताना दिसत आहेत.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण ((instagram - deepika padukone))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 12:19 PM IST

मुंबई - Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-वडील होणार आहेत. अलीकडेच तिनं तिचा लेटेस्ट फोटोशूट केला होता. आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दीपिकानं हा पारंपरिक लूक निवडला होता. अनंत आणि राधिकाच्या संगीत समारंभात जांभळ्या रंगाच्या साडीत दीपिकाचा बेबी बंप स्पष्ट दिसून येत होता. यापूर्वी पापाराझींच्या माध्यमातून तिचे गरोदरपणाचे फोटो आले होते. मात्र यावेळी तिने पहिल्यांदाच अशा प्रकारे बेबी बंप फ्लॉंट केल्याचं दिसून आलं.

दीपिका पदुकोणचा बेबी बंपमधील किलर लूक : यावेळी दीपिका पदुकोण सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. फोटो शेअर करताना, दीपिका पदुकोणनं यावर लिहिलं, "शुक्रवारची रात्र आहे आणि मला बाळाबरोबर पार्टी करायची आहे!" कॅप्शनमध्ये तिनं रणवीरला टॅगही केलंय. या फोटोंवर त्यानं देखील आपली प्रतिक्रिया देत लिहिलं,"'हाय्य्य्ये! माझ्या वाढदिवसासाठी सर्वात सुंदर भेट! तुझ्यावर खूप प्रेम आहे." अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यामधील दीपिका पदुकोणचे सुंदर व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत. दीपिकाच्या चाहत्यांना देखील तिचे फोटो खूप आवडत आहेत. अनेकजण तिच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

दीपिका पदुकोणचा चित्रपट : सध्या दीपिका पदुकोण नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिची भूमिका अनेकांना आवडली आहे. दरम्यान पुढं दीपिका रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि करीना कपूर खानबरोबर दिसणार आहे. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे. रुपेरी पडद्यावर 'सिंघम अगेन' 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. दीपिका सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. दरम्यान अंबानी फॅमिली पार्टीत दीपिका ही स्टायलिश दिसत होती.

हेही वाचा :

  1. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा 'संगीत सोहळा' संपन्न - sangeet ceremony
  2. 'मिर्झापूर'चा चार वर्षानंतर सीझन 3 रिलीज, सोशल मीडियावर प्रेक्षकांचा 'गजब भौकाल हैं'! - Mirzapur Season 3 X Review
  3. कंगना राणौतला झापड मारणाऱ्या कुलविंदर कौरची बदली? काय आहे प्रकरण जाणून घ्या... - KULWINDER KAUR IS STILL SUSPENDED

ABOUT THE AUTHOR

...view details