महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कॉमेडियन कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्तानं माखलेला टिसू पाहून चाहत्यांना बसला धक्का - KASHMERA SHAHS TERRIBLE ACCIDENT

कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी-अभिनेत्री कश्मीरा शाह एका भीषण अपघाताची बळी ठरली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं याबद्दल माहिती दिली आहे.

kashmera shah
कश्मीरा शाह (कश्मीरा शाह (IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 18, 2024, 2:37 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कश्मीरा शाह एका धोकादायक अपघाताची बळी ठरली आहे. आता बरा ती आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही धक्कादायक बातमी शेअर केली आहे. यावर आता कश्मीराचा पती-कॉमेडियन कृष्णा अभिषेकनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी कश्मीरानं तिच्या पोस्टनं सर्वांना आश्चर्यचकित केलं. कश्मीरानं तिच्या इंस्टाग्रामवर टिसूचा रक्तानं भिजलेला फोटो शेअर केला आहे. तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'मला वाचवल्याबद्दल देवाचे आभार. हा एक अतिशय विचित्र अपघात होता. काहीतरी मोठे घडणार होते. आशा आहे की, काही जखमांच्या खुणा राहणार नाही. प्रत्येक दिवस एका क्षणासाठी जगा. परत येण्याची वाट पाहू शकत नाही. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे.'

कश्मीराच्या पोस्टवर तिच्या पतीची प्रतिक्रिया :कश्मीराबरोबर हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कश्मीराच्या या पोस्टवर तिचा पती कृष्णा, मित्र आणि चाहत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. दरम्यान कृष्णानं या पोस्टवर लिहिलं, 'देवाचे आभार, की आता ती ठीक आहे.' कश्मीराची मैत्रिण-अभिनेत्री तनाज इराणीनं या पोस्टवर लिहिलं, 'ओएमजी, आशा आहे की तुम्ही ठीक असणार.' दीपशिखा नागपालनं या पोस्टवर लिहिलं, 'काय... अरे देवा, लवकर बरी हो'. कश्मीरासाठी प्रार्थना करत एका चाहत्यानं लिहिलं आहे की, 'देव सदैव तुमच्याबरोबर आहे.' इतर चाहत्यांनीही तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

कश्मीराचं वर्कफ्रंट : कश्मीरा अखेर कलर्स टीव्हीवरील रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये ती पती कृष्णाबरोबर कपल गोल्स साध्य करताना दिसली होती. याशिवाय या शोमध्ये अली गोनी, राहुल वैद्य, करण कुंद्रा, करण बिजलानी, पती विकी जैन, अंकित लोखंडे, निया शर्मा, सुदेश लाहिरी यांच्यासह अनेक कलाकार होते. दरम्यान कश्मीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, अनेकदा ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय आता कश्मीरा ही मोठ्या पडद्यावर बऱ्याच दिवसांपासून दिसली नाही. सध्या ती आपल्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवताना दिसते.

ABOUT THE AUTHOR

...view details