मुंबई -Citadel Honey Bunny Teaser: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि समांथा रुथ प्रभू स्टारर मोस्ट अवेटेड प्राइम व्हिडिओ वेब सीरीज 'सिटाडेल हनी बनी'ची रिलीज डेट आज 1 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली आहे. याबरोबर वेब सीरीजमधील वरुण आणि समांथाचे जबरदस्त पोस्टर शेअर करून एक टीझरही रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये वरुण आणि समांथा फुल ऑफ ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. 'सिटाडेल: हनी बनी'च्या टीझरमध्ये वेब सीरीजच्या स्टार कास्टचे चेहरेही समोर आले आहेत. यामध्ये केके मेनन, सिकंदर खेर, सोहम कपूर, शिवकिंत सिंग परिहार, साकिब सलीम, काशवी मजुमदार आणि सिमरन ऋषी बग्गा हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
सिटाडेल: हनी बनी' कधी आणि कुठे पाहू शकता? : वरुण धवन आणि समांथा रुथ प्रभू यांचे वेगवेगळे अवतार या टीझरमध्ये पाहायला मिळाले आहे. टीझरमध्ये वरुण आणि समांथा यांच्यामधील रोमान्सही पाहायला मिळत आहे. अलीकडे, 'सिटाडेल: हनी बनी'च्या निर्मात्यांनी 1.08 तारीख शेअर केली होती आणि प्रेक्षकांना गोंधळात टाकलं होतं. आता दिवशी टीझर आणि पोस्टर शेअर करून वरुणच्या चाहत्यांना निर्मात्यांनी भेट दिली आहे. 'सिटाडेल: हनी बनी' 7 नोव्हेंबर 2024 रोजी प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. आता या वेब सीरीजच्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत. 'सिटाडेल: हनी बनी' वेब सीरीजची शूटिंग ही परदेशात करण्यात आली आहे.