महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय; सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव - करीना कपूर आणि अनिल कपूर

Team India : अभिनेत्री करीना कपूर खान, अभिनेता अनिल कपूर आणि मृणाल ठाकूर यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर भारतीय क्रिकेट संघासाठी एक फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये त्यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.

Team India
टीम इंडिया

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 11:34 AM IST

मुंबई - Team India : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री करीना कपूर खान, अभिनेता अनिल कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी राजकोट (गुजरात) येथे झालेल्या विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीदरम्यान टीम इंडियानं क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. या शानदार यशाबद्दल क्रिकेटप्रेमी संघाचे अभिनंदन करत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपला आनंद व्यक्त करत आहेत. करीनानं 18 फेब्रुवारी रोजी इंस्टाग्राम स्टोरीवर भारतीय क्रिकेट संघाचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ''प्रशंसनीय, भारतीय संघ.'' याशिवाय या पोस्टवर तिरंगा इमोजी देखील तिनं पोस्ट केला आहे.

टीम इंडिया

अनिल कपूर आणि मृणाल ठाकूरची इंस्टाग्राम स्टोरी : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता अनिल कपूरने इंस्टाग्राम स्टोरीवर टीम इंडियाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्याने लिहिलं, 'टीम इंडिया'चा सर्वात मोठा विजय.'' मृणाल ठाकूरनेही इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. भारतीय संघाचा हा खूप मोठा विजय आहे.

भारत आणि इंग्लंडचा सामना : दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत फिरकीपटू रवींद्र जडेजानं पाच विकेट्स घेतल्या. त्याचवेळी भारतीय हिटमॅन रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि नवोदित सराफ खान यांनी आपल्या फलंदाजीनं इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलच धारेवर धरले. रविवारी राजकोटमधील तिसरा कसोटी सामना भारतानो 434 धावांनी जिंकला. हा सामना जिंकून भारतानं एक इतिहास रचला आहे. दरम्यान अनिल कपूर, मृणाल ठाकूर आणि करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अनिल कपूर शेवटी 'फायटर' चित्रपटामध्ये दिसला. पुढं तो 'तख्त' चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे मृणाल शेवटी 'हाय नन्ना'मध्ये दिसली होती. आता ती 'फॅमिली स्टार'मध्ये दिसणार आहे. याशिवाय करीना 'वीरे दी वेडिंग 2', ' द क्रू' , 'सिंघम 3' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' टायटल ट्रॅकचा टीझर रिलीज
  2. आलिया भट्टनं ब्लॅक वेल्वेट साडीत केलं चाहत्यांना घायाळ, 'पोचर' लंडन स्क्रीनिंगमधील फॅशन चर्चेत
  3. प्रियांका चोप्रा निक जोनासची मुलगी मालती मेरीचा बॉल पिटमध्ये खेळतानाचा फोटो व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details