महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'मिस्टर आणि मिसेस माही' स्क्रिनिंगमध्ये लव्हबर्ड्स खुशी कपूर-वेदांग रैनानं वेधलं लक्ष - Mr and Mrs Mahi - MR AND MRS MAHI

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या स्पेशल स्क्रिनिंगला सोमवारी संध्याकाळी मुंबईत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. खुशी कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड वेदांग रैना काळ्या पोशाखात पोहोचले होते.

Mr and Mrs Mahi Screening
'मिस्टर आणि मिसेस माही' स्क्रिनिंग ((Photo: ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 10:54 AM IST

मुंबई - जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग सोमवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू येथे आयोजित करण्यात आलं होतं. करण जोहर, बोनी कपूर आणि नेहा धुपिया यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी खुशी कपूर आणि तिचा कथित प्रियकर वेदांग रैना यांच्या स्टायलिश आगमनानं त्यांच्याकडे सर्व उपस्थितांचं लक्ष वेधलं गेलं.

'मिस्टर आणि मिसेस माही' स्क्रिनिंग ((Video source: ANI))

उत्तम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी जान्हवी कपूर 'मिस्टर आणि मिसेस माही'साठी तिच्या जबरदस्त प्रमोशनल लुक्सने पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेत भरली. या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये, तिनं चमकदार निळ्या बॉडीसूट टॉपची निवड केली होती, ज्यावर 'माही 06' असं लिहिलेलं होतं. तिनं डेनिम कार्गो पँट आणि जांभळ्या स्नीकर्ससह पेअर केलं होतं.

तिची बहीण खुशी कपूरनं देखील 'द आर्चीज' मधील तिचा सहकलाकार वेदांग रैनाबरोबर कार्यक्रमासाठी आल्यावर उपस्थितांवर चांगली छाप पाडली. या जोडप्याच्या काळ्या पोशाखांनं त्यांच्या ग्लॅमरमध्ये भर घातली. खुशीने चकचकीत काळा ड्रेस घातला होता, तर वेदांगने निळ्या जीन्ससह काळ्या कॉलरचा टी-शर्ट घातला होता.

स्क्रिनिंगमध्ये बोमन इराणी, अपारशक्ती खुराना, कुशा कपिला, आकांशा रंजन कपूर, धनश्री वर्मा, सोहा अली खान, कुणाल खेमू, अंशुला कपूर, करण टॅकर आणि जरीना वहाब यासह इतर सेलिब्रिटींची खास उपस्थिती होती.

करण जोहर निर्मित आणि शरण शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट एक रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा आहे. हा चित्रपट 31 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. चित्रपटाच्या मनोरंजक कथानकानं आणि प्रतिभावान मुख्य कलाकारांमुळं 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाबद्दल फिल्म इंडस्ट्रीमध्ये औत्सुक्याचं वातावरण निर्माण झालं आहे.

हेही वाचा -

"ऑल आय ऑन रफाह" चळवळीसाठी प्रियांका, रश्मिका ते कीर्तीपर्यंत भारतीय सेलिब्रिटींनी उठवला आवाज - All Eyes On Rafah

हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील पडद्यावर झळकणारी 20 नवीन जोडपी - Fresh Bollywood South Paring Alert

"यापेक्षा भारी मालिका नाही", म्हणत प्रेक्षकांनी दिली 'पंचायत ३' ला पसंती - Panchayat 3

ABOUT THE AUTHOR

...view details