मुंबई Shilpa Shetty Raj kundra cheated MPID : सोने व्यापारी पृथ्वीराज कोठारी यांची 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात बीकेसी पोलिसांनी तपास करावा असे आदेश मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन पी मेहता यांनी दिले आहेत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राविरोधात तपास करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश, नेमकं प्रकरण काय? - Shilpa Shetty - SHILPA SHETTY
Shilpa Shetty Raj Kundra cheated MPID : अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांनी 90 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी सोने व्यापारी पृथ्वीराज कोठारी यांनी तक्रार दाखल केली होती. यावर बीकेसी पोलिसांनी तपास करावा असे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत.
Published : Jun 14, 2024, 3:35 PM IST
नेमकं प्रकरण काय : सोने व्यापारी कोठारी यांनी शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्या सतयुग गोल्ड प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार करत न्यायालयासमोर दाद मागितली. याप्रकरणी एमपीआयडी कायद्यांर्तगत सतयुग कंपनीविरोधात कोठारी यांनी तक्रार केली होती. सतयुग गोल्ड प्रा. लि. या शिल्पा व राज कुंद्राच्या कंपनीनं सन 2014 मध्ये एक योजना जाहीर केली होती. त्याद्वारे जितकं सोनं हवं असेल तितक्या सोन्याची सवलतीतील जी किंमत होईल ती पूर्ण रक्कम गुंतवणूकदारांना सुरुवातीला जमा करावी लागणार होती व त्यानंतर पाच वर्षांनी गुंतवणूकदारांना ते सोनं परत मिळेल अशी योजना होती. या योजनेत मोठी रक्कम गुंतवण्यासाठी शिल्पा व तिच्या पतीनं तक्रारदार कोठारी यांना राजी केलं. त्यामुळं कोठारी यांनी एप्रिल 2014 मध्ये सदर योजनेत 90 लाख 38 हजार 600 रुपये गुंतवले. त्या बदल्यात एप्रिल 2019 मध्ये कोठारी यांना 5 किलो 24 कँरेट दर्जाचं सोनं मिळेल अशी खात्री देण्यात आली होती.
शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता : मात्र जानेवारी 2015 मध्ये सतयुग गोल्ड कंपनीनं ही योजना बंद करत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळं कोठारी यांनी कंपनीकडे या योजनेत गुंतवलेली आपली रक्कम परत देण्याची मागणी केली. मात्र, कोठारी यांना आश्वासन दिल्याप्रमाणे 2019 मध्ये 5 किलो सोनं मिळेल, अशी ग्वाही कंपनीकडून देण्यात आली. परंतु एप्रिल 2019 उलटून गेल्यानंतर जेव्हा जेव्हा कोठारी यांनी सोनं अथवा पैसे देण्याची मागणी केली तेव्हा तेव्हा त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं व त्यांना सोनं देण्यात आलं नाही. त्यामुळं शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा व त्यांच्या कंपनीनं आपली फसवणूक केल्याची कोठारी यांची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी शिल्पा व राज विरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सकृतदर्शनी कोठारी यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचं दिसून येत असल्याचं निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन पी मेहता यांनी नोंदवलं. तसंच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलिसांना दिले आहेत. त्यामुळं आता शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा समोरच्या कायदेशीर अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
हेही वाचा :