मुंबई - चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले प्रतिभावान प्रीतिश नंदी आता या जगात नाहीत. प्रीतिश यांचं ८ जानेवारी रोजी निधन झालं. त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. प्रीतिशच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण बॉलिवूड जगत शोकाकुल झाले असताना, ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता प्रीतिशच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहण्यास नकार दिला आहे. नीना गुप्तानं अशी भूमिका घेण्यामागे कारण काय आहे, हेही यानिमित्तानं समजून घेऊयात.
बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी चित्रपट निर्माते, लेखक आणि कवी प्रीतिश नंदी यांच्या निधनाच्या बातमीला पहिल्यांदा दुजोरा दिला. त्यांनी नंदी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून शोक व्यक्त केला. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की, माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या प्रीतिश नंदी यांच्या निधनाबद्दल ऐकून मला खूप दुःख झालंय आणि धक्का बसला आहे. ' ते एक अद्भुत कवी, लेखक, चित्रपट निर्माता आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक-पत्रकार होते'.
त्यांनी पुढं लिहिले की, "मुंबईतील माझ्या सुरुवातीच्या काळात ते माझ्यासाठी आधार आणि शक्ती होते. आमच्यात अनेक गोष्टी साम्य होत्या. ते मला भेटलेल्या सर्वात निर्भय लोकांपैकी एक होते. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. फिल्मफेअर आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, द इलस्ट्रेटेड वीकलीच्या मुखपृष्ठावर त्यांनी मला झळकावून दिलं तेव्हा मी ते कधीही विसरू शकत नाही. ते मित्रांच्या मित्राची खरी व्याख्या होते. मित्रा, आपण एकत्र घालवलेला वेळ मला खूप आठवेल."
करीना कपूर
प्रीतश नंदी यांच्याबरोबर चमेली चित्रपटात काम करणारी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनंही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चमेलीच्या सेटवरून प्रीतिशबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आणि लाल हृदय आणि हात जोडून इमोजी जोडून त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला.
संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनंही चित्रपट निर्माता प्रीतिश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूडच्या मुन्नाभाईंनं xHamster वर प्रीतिशचा फोटो अपलोड केला आणि लिहिलं, "ते एक खरे सर्जनशील प्रतिभावान आणि दयाळू अंतकरणाचे होते. मला तुमची आठवण येईल साहेब."