मुंबई Bobby Deol Birthday :'सोल्जर', 'बरसात', 'अपने' आणि 'अॅनिमल' यांसारख्या चित्रपटात काम करून हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता बॉबी देओल आज 27 जानेवारी रोजी आपला 55वा वाढदिवस साजरा करत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्याला भाऊ सनी देओल आणि बहीण ईशा देओल, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, सौरभ सचदेवा आणि दोन्ही पुतणे करण आणि राजवीर देओल यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'ॲनिमल' या चित्रपटात खलनायक अबरार हकची भूमिका साकारून तो जगभरात प्रसिद्ध झाला.
बॉबी देओलचा 55वा वाढदिवस : 'ॲनिमल' चित्रपटानंतर त्याची फॅन फॉलोइंग रातोरात वाढली असून आता त्याचे चाहते त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. दरम्यान साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री रश्मिका मंदान्नानं बॉबीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिनं लिहिलं, 'प्रत्येक क्षणी प्रेम करणाऱ्या बॉबी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' याशिवाय ईशा देओलनं तिच्या पोस्टवर लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ. मला खूप अभिमान आहे तुझा." दरम्यान, करण देओलनं काकासोबतचा फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलं, ''तुम्ही अशीच लोकांना प्रेरणा देत राहा आणि तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी राहो.'' दुसरीकडे राजवीर देओलनं काकासाठी पोस्टमध्ये लिहिलं, ''वाढदिवसाच्या शुभेच्छा काका, तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे.''