महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिजीत सावंत आणि पंढरीनाथ कांबळेमध्ये रंगली चर्चा, अरबाज पटेलला आहे धोका ? - Bigg Boss Marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5 : अभिजीत, संग्राम आणि पंढरीनाथ कांबळे हे आजच्या एपिसोडमध्ये अरबाज पटेलबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. आता सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 17, 2024, 2:31 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो आता रंगतदार वळणावर आला आहे. वैभव चव्हाण या शोमधून बाहेर गेल्यानंतर घरातील सदस्य आता सावध झाले आहेत. हा शो जिंकण्यासाठी स्पर्धक आपला 100 टक्के लक्ष खेळावर केंद्रित देताना दिसत आहेत. या आठवड्यात घरात 'जंगल राज' आहे. आधीच्या झालेल्या एपिसोडमध्ये घरातील प्रत्येक सदस्याने टास्क जिंकण्याचा खूप प्रयत्न केला होता. दरम्यान घरातील सदस्य एकमेकांविरोधात रणनीती आखताना दिसत आहेत. 'बिग बॉस' निर्मात्यांनी एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अभिजीत सावंत आणि पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी आणि संग्राम अरबाज पटेलबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.

अभिजीत, पॅडी दादा आणि संग्राममधील चर्चा : आता घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी अरबाज हा नॉमिनेट झाला आहे. दरम्यान प्रोमोत अभिजीत संग्रामला म्हणतो की, ''मला वाटतं यावेळी अरबाज जाईल.'' यावर संग्राम उत्तर देतो, ''मग निक्कीचं काय होणार?'' नंतर अभिजीत आणि पॅडी म्हणतात, "दोघाचं गुलुगुलू सुरू असते.'' पुढं अभिजीत म्हणतो, ''अरबाज टास्कपुरता येतो आणि नंतर आपल्या गुहेत जातो. सिंह कसे असतात हे माहित आहे ना? शिकार तर सिंहीण करत असते." 'बिग बॉस'च्या घरातून वैभव चव्हाणची एक्झिट झाल्यानंतर अरबाजला मोठा धक्का बसला आहे. ग्रुप 'ए'मध्ये अरबाज आणि निक्की हे दोघेच उरले आहेत. जान्हवी किल्लेकरचं सध्या या दोघांबरोबर पटत नसल्याचं दिसत आहे.

कोण झालं नॉमिनेट :बंदूक उचलण्याच्या टास्कमध्ये अपयशी झाल्यानं 'ए टीम'मधील सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वर्षा उसगावंकर आणि जान्हवी किल्लेकर यावेळी घराबाहेर पडण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. आता 'बिग बॉस'च्या घरात या पाच सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे. टास्कमध्ये अपयशी झाल्यानंतर निक्कीचा चेहरा चांगलाच उतरला होता. आता सोशल मीडियावर अनेकजण निक्की आणि अरबाजला कमी वोट करा, असं म्हणताना दिसत आहेत. अनेकजण या जोडीला तोडण्याबद्दल सोशल मीडियावर बोलत आहेत.

हेही वाचा :

  1. आर्या जाधवनंतर वैभव चव्हाणला शोमधून 'बिग बॉस'नं दाखवला बाहेरचा रस्ता, नवीन प्रोमो रिलीज - Bigg Boss Marathi
  2. रितेश देशमुख 'भाऊचा धक्का', निक्की तांबोळीला कानशिलात लगावल्याबद्दल आर्या जाधवला फटकारलं - riteish deshmukh
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये जान्हवी विरुद्ध वैभव, अरबाज आणि निक्की रंगणार सामना... कोण मारणार बाजी? - Bigg Boss Marathi 5

ABOUT THE AUTHOR

...view details