मुंबई - 'बिग बॉस 18'च्या सुरुवातीपासून अविनाश मिश्रा चर्चेत आहे. 16 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये 'बिग बॉस'नं दिलेल्या टास्क दरम्यान अविनाश घरातील काही सदस्यांबरोबर वाईट पद्धतीनं भांडताना दिसला. यावेळी अविनाशचे घरातील सदस्यांबरोबरचे भांडण इतके वाढले की, 'बिग बॉस'नं अचानक अविनाशला घरातून बाहेर काढण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर अविनाशची मैत्रिण ईशा सिंह रडते आणि अविनाशच्या वतीनं सॉरी म्हणते. सध्या रिॲलिटी शो 'बिग बॉस 18'मध्ये गोंधळ सुरू असल्याचं दिसत आहे.
विवियन डिसेना आणि रजत दलाल यांची झाली भांडणं :दुसरीकडे, आता विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्यात जेवणावरून लढत शोमध्ये पाहायला मिळत आहे. दोघेही उद्धटपणा दाखवताना आणि एकमेकांना धमकावताना एका व्हिडिओत दिसत आहे. बिग बॉस 18 च्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, विवियन डिसेना खूप रागावलेला दिसत आहे आणि म्हणतो की, "मी जेवणामध्ये सर्व काही खाऊ शकतो. मी गॅस देखील चालू करू शकतो आणि मला कोणीही रोखू शकणार नाही." यानंतर रजत म्हणतो, "तू म्हणालास की मी गॅस चालू करून दाखवतो, मला कोणी अडवू शकत नाही. चला आता गॅस चालू करू दाखव, हा मी हात चढवेल तुझ्यावर, तू आतमध्ये असेल, तेव्हा मी तुला नक्की अडवेल." हे ऐकून विवियन एक व्यंग्यात्मक स्मितहास्य करत म्हणतो, "चल ठिक आहे आता अडवून दाखव मला, एका टाईम तू अडव."