मुंबई - Bigg Boss 17 :'बिग बॉस 17' ग्रँड फिनालेच्या अगदी जवळ आला आहे. लवकरच या शोचा विजेता जगासमोर येईल. आता या शोमध्ये फक्त 6 स्पर्धक उरले आहेत. या स्पर्धकांना फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान या शोचा मागील एपिसोड अतिशय रोमांचक होता. बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेदरम्यान कुटुंबातील सर्व सदस्यांना मीडियाच्या तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागले. यावेळी पत्रकारांनी विकी जैनवर अनेक आरोप केले. विक्कीनं मीडियाच्या सर्व प्रश्नांना उत्तर धीटपणे दिली.
पत्नी अंकिता लोखंडेची माफी मागितली : एका पत्रकारानं विकीला विचारले की, ''तुम्ही तुमच्या पत्नीसाठी कधी भूमिका घेणार?'' तर यावर विकी म्हटलं की, ''जेव्हा दोन बोलके लोक वाद घालतात, ते वाढतच जाते.'' तर दुसर्या रिपोर्टरनं विकीला विचारले की, 'शो संपल्यानंतर तुम्ही आणि अंकिता कपल थेरपीसाठी जाणार का?, तर यावर विकी म्हणतो, 'थेरपी इथेच आहे. आता मी गुडघ्यावर जाऊन तिला सॉरी म्हणेन.'' यानंतर तो गुडघ्यावर बसतो आणि अंकिताला म्हणतो, ''माफ कर मंकू, माझ्याकडून चुका झाल्या, मला माफ कर.'' यावेळी विकीला त्याच्या चुका लक्षात आल्या. विकीनं पुढं सांगितलं की, 'मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आम्ही दोघे घरी एकटे राहतो. त्यावेळी तुमच्या चुका सांगण्यासाठी कोणीही तुमच्याबरोबर नसते , त्यामुळे तुम्हाला काही कळत पण नाही. आज या 100 दिवसांत जेव्हा प्रत्येकजण मला एकच प्रश्न विचारत आहे, तेव्हा मी माझ्या भूतकाळातील सर्व चुकांचा विचार करत आहे, ज्या मला कधीच कळल्या नाहीत. आमच्यात काहीतरी चूक झालंय, जे व्हायला नको होतं.''