मुंबई -'भूल भुलैया 3' पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. दरम्यान 15 ऑक्टोबर रोजी, कार्तिक आर्यननं इंस्टाग्रामवर 'भूल भुलैया 3'च्या टायटल ट्रॅकचा टीझर शेअर केला आहे. हा ट्रॅक खूप धमाकेदार असणार आहे. दरम्यान कार्तिक आर्यन, दिलजीत दोसांझ आणि आंतरराष्ट्रीय संगीत आयकॉन पिटबुल हे आता या ट्रॅकद्वारे धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जागतिक मंचावर आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकणारा दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा आपल्या आवाजानं चाहत्यावर जादू करणार आहे.
'भूल भुलैया 3'मधील आगामी गाणं : 'भूल भुलैया 3'च्या टायटल ट्रॅक 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा टीझरमध्ये करण्यात आली आहे. या गाण्याचा टीझर शेअर करताना कार्तिकनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'दिलजीत एक्स (X) पिटबुल आणि ओजी नीरज या सर्वोत्कृष्ट कोलॅबसह रूह बाबा जागतिक पातळीवर जातोय.' भूल भुलैया 3' च्या भयानक स्लाईडसाठी सज्ज व्हा.' शेअर केलेल्या टीझरमध्ये कार्तिकचे धमाकेदार डान्स मूव्ह दिसत आहेत. टीझरमधील कार्तिकचा डान्स हा चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. सध्या या टायटल ट्रॅकची छोटी झलक दिसल्यानं अनेकजण या गाण्याबद्दल सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.