मुंबई - Bade Miyan Chote Miyan Trailer OUT : अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ स्टारर ॲक्शन ड्रामा चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा ट्रेलर आज 26 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. आज सकाळी 'बडे मियाँ छोटे मियाँ'चं नवीन पोस्टर शेअर करून निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजच्याबाबतीत माहिती दिली होती, शेवटी ट्रेलर रिलीज झाला आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा ट्रेलर पाहण्यासारखा आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ शानदार ॲक्शन करताना दिसत आहेत. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाची निर्मिती जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांची प्रॉडक्शन कंपनी पूजा एंटरटेनमेंटची आहे.
'बडे मियाँ छोटे मियाँ'चं ट्रेलर रिलीज :'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येत्या ईदला म्हणजेच 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चं शूटिंग वेगवेगळ्या शहरांमध्ये झाले असून हा चित्रपट खूप मनोरंजक असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून पहिल्यांदाच अक्षय आणि टायगर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. दरम्यान, हे दोन्ही स्टार्स गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या जोडीनं त्याचे काही ॲक्शन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते, जे अनेकांना खूप आवडले होते.