मुंबई - Ayushmann Khurrana :अभिनेता आयुष्मान खुराना हा न्यूयॉर्कमधील टाईम 100 गालामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुष्मानला टाइम मॅगझिननं दोनदा सन्मानित केलं आहे. 2023 मध्ये, त्याला टाईम 100 इम्पैक्ट अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. या पुरस्कारासाठी निवड झालेला तो एकमेव भारतीय आहे. या मॅगझिनसाठी 2020 मध्ये जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याच नाव देखील सामील होत. आयुष्मान हा टाईम 100 गालामध्ये पॉप स्टार दुआ लीपाबरोबर दिसणार आहे. या कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक सोफिया कोपोला, अभिनेता, चित्रपट निर्माता इलियट पेज, अभिनेता काइली मिनोग, मायकेल जे फॉक्स आणि डिझायनर टोरी बर्च यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहू शकतात.
आयुष्मान खुरानाचं करिअर :आयुष्मान खुरानाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं चित्रपटसृष्टीत 'विकी डोनर' या चित्रपटामधून पदार्पण केलं होत. त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप गाजला होता. या चित्रपटामधील त्याचं गाणं देखील खूप हिट झालं होत. या चित्रपटानंतर त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. तो या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर यामी गौतम दिसली होती. अभिनयाबरोबर त्यानं संगीताच्या दुनियेतही खूप नाव कमावलं आहे. त्यानं 'पानी दा रंग' आणि 'साडी गली आजा' यासह अनेक हिट गाणी दिली आहेत. आयुष्माननं अनेक शोमध्ये आपल्या आवजाची जादू दाखवली आहे. आता आयुष्मान आपल्या संगीताला जागतिक पातळीवर घेऊन जात आहेत.