मुंबई - Arti singh wedding : स्टार कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आता आरतीच्या लग्नाला फक्त एक आठवडा उरला आहे. अलीकडेच आरतीच्या घरी लग्नाआधी माता राणीचं जागर झालं होतं. यानंतर सर्व नातेवाईकांसाठी एक पार्टी देण्यात आली होती. आरतीनं सर्व जागरणचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान आरती काशी विश्वनाथ मंदिरात लग्नाचे पहिले कार्ड घेऊन महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली आहे. आता सोशल मीडियावर आरतीचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात ती लाल रंगाचा ड्रेसमध्ये दिसत आहे.
कृष्णा अभिषेकच्या बहीणीचं लग्न :व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात लाल रंगाची लग्नपत्रिका दिसत आहे. या पत्रिकेत आरती आणि दीपक असं लिहिलं आहे. आरती बिझनेसमन दीपक चौहानबरोबर लग्न करणार आहे. आरतीचं दीपकबरोबरचं नात तिच्या मावशीनं पक्के केले आहे. आरतीचा लग्नासाठी होकार मिळविण्यासाठी दीपकनं अनेक प्रयत्न केले होते. आता आरतीनं लग्नासाठी होकार दिल्यानंतर 25 एप्रिल रोजी हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. आरती सिंहचे चाहते तिच्या लग्नाची वाट आतुरतेनं पाहात आहेत.