महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळीच्या मैत्रीमुळे अरबाज पटेल नाराज, घरात केला राडा - Bigg Boss Marathi 5 - BIGG BOSS MARATHI 5

Bigg Boss Marathi 5: अभिजीत सावंतबरोबर निक्की तांबोळीची मैत्री झाल्यामुळे अरबाज पटेल हा नाराज झाला आहे. यामुळे आता त्यानं नक्कीबरोबर वाद केला आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2024, 1:16 PM IST

मुंबई Bigg Boss Marathi 5 :'बिग बॉस मराठी 5' हा शो आता खूप रंगदार झाला आहे. बिग बॉसच्या घरात महिन्याभरात काही सदस्याच्या नात्यामध्ये बदल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या एपिसोडमध्ये 'बिग बॉस'नं घरातील सदस्यांना जोड्यांच्या बेडीत अडकवलं. निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंतची जोडी घरात आता कल्ला करेल, असं सध्या दिसत आहे. निक्की आणि अभिजीतमधील मैत्री ही दोन्ही ग्रुपमधील सदस्यांना आता धोका वाटायला लागली आहे. आता दोघांमुळे घरात काय होऊ शकते, याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीमध्ये झाला वाद : बिग बॉसच्या घरात महिन्याभरातचं ग्रुप 'ए'मध्ये फुट पाहायला मिळत आहे. बिग बॉस निर्मात्यांनी इंस्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलमध्ये भांडणं पाहायला मिळत आहे. अरबाज हा घरात नक्कीवर चिडचिड करत काही वस्तू आदळआपट करताना प्रोमोत दिसत आहे. निक्की आणि अभिजीतमधील मैत्री अरबाजला खूप खटकत आहे. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत पोळी बनवत आहे, यानंतर निक्की सहज हसते. यावेळी अरबाज तिला म्हणतो, "हसत आहेस" आणि भांडी फोडतो. त्यावर निक्की म्हणते,"काय याचा बालीशपणा.'' यानंतर त्याचा राग खूप उग्र होतो आणि तो घरातील एक खुर्ची हा जमिनीवर आदळतो.

अरबाज पटेलनं फोडल्या घरातील वस्तू : यानंतर अरबाज म्हणतो की "तू मला अशा वागण्यानं हर्ट करत आहे." यावर निक्की म्हणते, " तुला माझी गरज नाही." यानंतर अरबाज म्हणतो, "नाही आहे, आता हे पाहून तर अजिबातच नाही." यावर नक्की म्हणते, "हे असं स्पष्ट बोलायचं माझ्याबरोबर." निक्की आणि अभिजीतमधील मैत्री ही अरबाजला बघवली जात नाही, यामुळे तो घरात दुखावला जात आहे. निक्कीवर संतापलेल्या अरबाजला घरातील काही सदस्य शांत करताना दिसतात. बिग बॉसच्या घरातील वस्तूंचं नुकसान केल्यावर घरातील सदस्यांवर कठोर कारवाई केली जाते. यापूर्वीच्या सीझनमध्ये काही सदस्यांना घरातील जेलमध्येही टाकण्यात आलं होतं. आता जान्हवीला तिच्या वर्तवणुकीमुळे जेलची शिक्षा मिळाली आहे. अरबाजनं घरात तोडफोड केल्यानं त्याला बिग बॉस कोणती शिक्षा देईल, हे काही तासात समजेल.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस'च्या घरात कोल्हापूरचा रांगडा गडी करतोय 'कल्ला', धनंजय पोवारांची आई म्हणतेय 'आगे आगे देखिये होता है क्या...' - Bigg Boss Marathi 5
  2. अरबाज पटेलची कॅप्टन्सी धोक्यात, घरातील सदस्याच्या सोईसुविधांसाठी करणार त्याग? - Bigg Boss Marathi 5
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये अभिजीत सावंतमुळे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात होणार वाद - Bigg Boss Marathi

ABOUT THE AUTHOR

...view details