मुंबई - Bigg Boss Marathi 5 :'बिग बॉस'च्या घरात कॅप्टनपद खूप महत्त्वाचं मानलं जातं. कॅप्टन असलेल्या व्यक्तीकडे विशेषाधिकार असून त्याचा एक आठवड्याच्या नॉमिनेशनपासून देखील बचाव होतो. 'बिग बॉस'च्या घरात कॅप्टन हा घरातील निर्णय घेत असतो. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये सुरुवातीपासून दोन टीम तयार झाल्या आहेत. त्यामुळे ज्या टीममधील सदस्य कॅप्टन होईल, त्या टीमलादेखील कॅप्टन्सीचा फायदा होत असतो. 'बिग बॉस मराठी 5' हा शो आता खूप रंजक होत आहे. या शोची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू वालावलकर झाली होती. यानंतर घरात एक टास्क झाला. यात अरबाज पटेल हा घराचा दुसरा कॅप्टन झाला.
अरबाज कॅप्टन्सी गमावणार? : दरम्यान 'बिग बॉस' निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये अरबाजच्या कॅप्टन्सीवर टांगती तलवार असल्याचं दिसत आहे. या शोमध्ये आता अरबाज आपली कॅप्टन्सी गमावू शकतो. 'बिग बॉस' मराठीच्या नवीन प्रोमोत 'बिग बॉस' अरबाजला म्हणतो, "अरबाज बीबी करन्सीद्वारे दोन्ही टीम्स काही सोईसुविधा विकत घेऊ शकता, मात्र तुला त्याबदल्यात आपलं कॅप्टन्सी गमवावं लागेल. आता तुला तुझा किंवा घराचा फायदा निवडायचा आहे, याबद्दल ठरव. 'बिग बॉस'नं ही गोष्ट म्हटल्यानंतर घरातील सदस्य हे आश्चर्यचकित होतात. आता अरबाज यावेळी काय करणार, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.